शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

चक्क नाेकरदारांनीच घेतले रिक्षा परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने ...

तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने नियमाप्रमाणे कायद्याने बेरोजगार व्यक्तींनीच घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, माहिती लपवून खोटे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करून राज्य केंद्र सरकारी नोकरदारांनी रिक्षा परवाने घेतल्याची माहिती राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेने दिली आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाने परवानाधारक ऑनलाईन फॉर्म माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षा परवानाधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे.

आर्थिक सुबत्ता चांगली असतानाही रेल्वे, बँक, एसटी महामंडळ , इतर महामंडळे, नगरपालिका, मल्टिनॅशनल कंपनी व इतर खासगी कंपनीमध्ये कामाला असताना अनेक नोकरदारांनी मोठ्या संख्येने रिक्षा परवाने व रिक्षा घेतल्या व भाड्याने विनालायसन्स बॅच अप्‌प्रवृत्ती चालकांना चालवायला दिल्या जात आहेत. त्यामुळे गरज नसताना रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यातून गुन्हेगारी वाढली, तक्रारी वाढल्या आहेत. अप्‌प्रवृत्तीमुळे प्रामाणिक रिक्षावाला व रिक्षा व्यवसाय बदनाम झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शासन घोषित परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान प्राप्ती आहे. ऑनलाईन अर्ज भरताना खोटी माहिती देऊन रिक्षा परमिट काढलेल्या नोकरदारांचे पितळ उघडे पडेल म्हणून अनेक नोकरदार परमिटधारक अर्थसाहाय्य अर्ज भरत नाहीत. शासकीय नोकरदारांची प्रायव्हेट फंड व माहिती ऑनलाईन असल्यामुळे जाहीर होईल. परिवहन प्रशासन आरटीओने परवानाधारक ऑनलाईन अर्ज माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षापरवानाधारक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी. व सदर रिक्षा व परमीट लायसन्स बॅच असलेल्या गरजू बेरोजगारास द्यावी जेणेकरून बजबजपुरी व अप्‌प्रवृत्तीला आळा बसेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास राजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव व सचिव संतोष सातोसे यांनी दिला आहे.