शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भात लागवडीच्या कामाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले पाच-सहा दिवस पाऊस गायब असल्याने भातशेती लागवडीची कामे खोळंबली आहेत. पाण्याअभावी जमिनीला तडे गेले आहेत. लागवड केलेली रोपे पिवळी पडली आहेत. कडाक्याचा उन्हामुळे भाताची रोपे वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. भातपेरणीच्या कामासह नांगरणी व अन्य मशागतीची कामेही पूर्ण करून घेतली. पावसामुळे रोपांची जोमदार वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या कामांना प्रारंभ केला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला असला तरी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता होती, त्या मळेशेती, पाणथळ भागातील भात खाचरातून लागवडीची कामे उरकण्यात येत होती. मात्र, पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून कडकडीत उन्ह पडत आहे. दिवसभरात एखादी सर आली तर अन्यथा कडाक्याच्या उन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. लागवड केलेल्या क्षेत्रातील जमिनीला तडे गेले आहेत. रोपांचा रंग बदलला असून पिवळसर झाली आहेत. त्यामुळे रोपे जगण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांनी भाड्याने पंप घेऊन लागवड सुरू केली आहे. लागवड होत असली तरी पाऊस नसल्याने खर्च आणि परिश्रम वाया जात आहे. तुलनेमध्ये उत्पन्न कमी येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.