डिजिटल अरेस्टच्या भीतीने निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटींचा गंडा, दापोलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:35 IST2026-01-20T13:34:24+5:302026-01-20T13:35:11+5:30

दापोली (जि. रत्नागिरी ) : डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १ कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचा ...

Retired professor swindled Rs 1 crore due to fear of digital arrest Dapoli incident | डिजिटल अरेस्टच्या भीतीने निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटींचा गंडा, दापोलीतील प्रकार

डिजिटल अरेस्टच्या भीतीने निवृत्त प्राध्यापकाला सव्वा कोटींचा गंडा, दापोलीतील प्रकार

दापोली (जि. रत्नागिरी) : डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका निवृत्त प्राध्यापकाची तब्बल १ कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत उघडकीला आला आहे. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून विस्तार शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी यांना आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक या तिघांनी ४ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत फोनद्वारे संपर्क साधला. संशयितांनी आपण बंगळुरू पोलिस आणि नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर जोशी यांच्या नावावर कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) शाखेत खाते असून, त्यामध्ये ३ कोटी रुपयांचा घाेटाळा झाल्याचे सांगितले.

या कथित गुन्ह्याप्रकरणी ५० लाखांचा दंड आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवत जोशी यांच्यावर तिघांनी मानसिक दबाव टाकला. त्यानंतर संशयितांच्या सूचनेनुसार जोशी यांना ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी २३ लाख भरायला सांगितले. डाॅ. जोशी यांनी भीतीपोटी ही रक्कम भरली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. जोशी यांनी दापोली पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तीन संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title : डिजिटल अरेस्ट के डर से सेवानिवृत्त प्रोफेसर को ₹1.23 करोड़ का चूना

Web Summary : दापोली के एक सेवानिवृत्त प्रोफेसर को पुलिस और सीबीआई अधिकारी बनकर ठगों ने ₹1.23 करोड़ का चूना लगाया। उन्होंने डिजिटल अरेस्ट और ₹3 करोड़ के बैंक धोखाधड़ी के झूठे मामले की धमकी देकर उनसे अलग-अलग बैंक खातों में पैसे वसूल किए।

Web Title : Retired Professor Duped of ₹1.23 Crore in Digital Arrest Scam

Web Summary : A retired professor from Dapoli lost ₹1.23 crore to scammers posing as police and CBI officers. They used the threat of digital arrest and a fake ₹3 crore bank fraud case to extort money from him into various bank accounts.