टायटन राजा मंडळ स्पर्धेचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST2021-09-23T04:35:29+5:302021-09-23T04:35:29+5:30

खेड : खेड शहरातील शिवतररोड येथील टायटन राजा कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्र व महिला मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध ...

Results of the Titan King Circle competition | टायटन राजा मंडळ स्पर्धेचे निकाल

टायटन राजा मंडळ स्पर्धेचे निकाल

खेड : खेड शहरातील शिवतररोड येथील टायटन राजा कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्र व महिला मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

चित्रकला स्पर्धेत लहान गटात अंशुमन राठोड, अध्या बागडे तर मोठ्या गटात संस्कृती चिकणे, सृष्टी कविस्कर, निबंध स्पर्धेत रेवा पाटणकर, प्रांजल काते, तर मोठ्या गटात स्विटी भंडारे, विराज कीटक, वक्तृत्त्व स्पर्धेत त्रिशा रुके, राजवीर कांबळे तर, मोठ्या गटात प्रिन्सी कांबळे, तृप्ती धोकरे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले.

सेल्फीगिरी बाप्पा स्पर्धेत शंतनू बागडे, सारा राऊत तर मोठ्या गटात आर्यन देसाई, पूर्वा दळवी, कुटुंब नृत्य स्पर्धेत सचिन वानखेडे, अनुष्का बागडे, समूह गायन स्पर्धेत साक्षी जांबेकर, रेवा पाटणकर, साडी स्पर्धेत मेघा कवितके, संध्या पाटणे तर वेशभूषा स्पर्धेत मेगा कवितके, सरिता देवळेकर, मेहंदी स्पर्धेत नेहा गुडेकर, दर्शना महाडीक, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धेत रचना पाई, सिद्धी तांबडे, तर रांगोळी स्पर्धेत तनुजा राऊत, सुषमा पवार यांना अनुक्रमे पहिले दोन क्रमांक देण्यात आले. या स्पर्धेचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अमोल दळवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले.

Web Title: Results of the Titan King Circle competition