शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनची ‘सीमारेषा’ प्रथम

By admin | Updated: January 15, 2015 23:32 IST

यरनाळकर एकांकिका स्पर्धा : कलावलय संस्थेच्यावतीने आयोजन

वेंगुर्ले : येथील कलावलय संस्थेने आयोजित के लेल्या स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनची ‘सीमारेषा’ एकांकिका प्रथम आली. सिद्धीविनायक हॉलमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे, सातारा, डोंबिवली येथील १४ संघांनी सहभाग घेतला होता. समर्थ अकॅडमी, पुणेच्या ‘ओळखलंत का सर’ ही एकांकिका द्वितीय, तर संवाद साताऱ्याची ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ तृतीय आली. मैत्री कलामंच, डोंबिवलीची ‘मुखवटे’ व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची ‘आकडा’ यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविले. ‘वैयक्तिक’मध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन- प्रथम-नंदकिशोर धुपेकर (सीमारेषा, रत्नागिरी), द्वितीय-सुमित वाडकर (ओळखलंत का सर, पुणे), तृतीय क्रमांक-संतोष पाटील (वेडींग अ‍ॅनव्हर्सरी, सातारा). तांत्रिक विभाग- प्रथम क्रमांक-सीमारेषा, (रत्नागिरी), द्वितीय-‘वेडींग अ‍ॅनिव्हर्सरी (सातारा), तृतीय क्रमांक -आकडा (सातारा). स्त्री अभिनय - अपूर्वा रिसबुड (ओळखलंत का सर, पुणे), मेघा जोशी (मुखवटे, डोंबिवली), हर्षला तोरसकर (फुटबॉल, कसाल). पुरुष अभिनय- सुमित वाडकर (ओळखलंत का सर, पुणे), विवेक गोखले (सीमारेषा, रत्नागिरी), संतोष पाटील (वेडींग अ‍ॅनिव्हर्सरी, सातारा). उदयोन्मुख दिग्दर्शकाचे बक्षीस श्री समर्थ कलाविष्कार, देवगडच्या ‘एंड आॅफ द बिगिनिंग’चे दिग्दर्शक अभिषेक कोयंडे यांना देण्यात आले. परीक्षण जितेंद्र देशपांडे व प्रा. प्रकाश इनामदार यांनी केले. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी ‘कलावलय’चे अध्यक्ष रमेश नार्वेकर, माजी अध्यक्ष सुरेंद्र खामकर, अमोल महाजन, संजय पुनाळेकर, दिगंबर नाईक, राजन गिरप, शशांक मराठे, जितेंद्र वजराठकर, पंकज शिरसाट, पी. के. कुबल, प्रकाश पावसकर, जितेंद्र सामंत, अमेय तेंडोलकर, प्रवीण सातार्डेकर, विनायक जोशी, आदी उपस्थित होते. परीक्षकांच्या निर्णयाशी जुळणाऱ्या निर्णयाला सुजाण प्रेक्षकांसाठी ठेवलेले दोन हजारांचे बक्षीस निशा वायंगणकर हिने पटकाविले. (प्रतिनिधी)