शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचे दोन प्रकल्प विभागीय पातळीवर

By admin | Updated: October 30, 2015 23:17 IST

कौतुकास्पद वाटचाल : वाटदची सायली पारकर, खेर्डीची साक्षी सुतार यांचा समावेश

खालगाव : रत्नागिरीच्या एम. एस. नाईक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेत पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटदची सायली पारकर आणि खेर्डीची साक्षी सुतार यांचे प्रकल्प उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या सोबत नाईक हायस्कूलचा सोबन होडेकर, वरवडे हायस्कूलची प्राची निवळकर आणि खेर्डी (ता. चिपळूण)ची प्रेरणा गमरे यांनीही आपल्या प्रकल्पांचे उल्लेखनीय सादरीकरण केले.आश्रय सेवा संस्था या जिल्हा समन्वयक संस्थेने जिल्हा विज्ञान मंडळाच्या सहकार्याने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बालविज्ञान परिषदेचे उद्घाटन एम. एस. नाईक स्कूलचे पर्यवेक्षक आणि बालविज्ञान परिषदेचे माजी बालवैज्ञानिक अकिब काझी यांच्याहस्ते झाले. यावेळी समन्वयक संस्थेचे अध्यक्ष अरूण मुळ्ये व जिल्हा समन्वयक संजय मुळ्ये उपस्थित होते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक सुयोग सावंत आणि सुमेध मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. या प्रकल्पातून पाच प्रकल्पांची नोव्हेंबरमध्ये पुणे येथे आयोजित केलेल्या विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.विभागीय फेरीसाठी निवडण्यात आलेल्या आणि उल्लेखनीय ठरलेल्या प्रकल्पांमध्ये खंडाळ्याच्या पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या सायली पारकर हिने टेस्टिंग आॅफ इमिशन्स फ्रॉम टू व्हिलर्स आणि नाईक स्कूलच्या होडेकर याने बायोफिक्सेशन बाय अल्गी हे पर्यावरण प्रदूषणाशी निगडीत प्रकल्प सादर केले. तसेच वरवडे हायस्कूलची प्राची निवळकर हिने सर्वत्र दुर्लक्षित अशा टाकळा या झाडाचे इकोफ्रेंडली नेचर दाखवण्याचा प्रयत्न केला. खेर्डी हायस्कूलच्या साक्षी सुतारने वर्मी वॉश तयार केले, तर याच शाळेच्या प्रेरणा गमरे हिने युरिनपासून आॅरगॅनिक खत तयार केले होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रय सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, नाईक स्कूलचे सर्व सहकारी आणि शिवाजी पाटील यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)