रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५६पैकी तब्बल ४१ गटात आणि पंचायत समितीच्या ११२ पैकी ७२ गणांमध्ये विजय मिळवून जिल्ह्यात शिंदेसेनेने एकतर्फी वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) दुसऱ्या क्रमांकावर, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. गणांमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी (अजित पवार) तिसऱ्या तर उद्धवसेना चाैथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही, त्याचवेळी मनसेने एका जागेवर विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.मंडणगड तालुक्यातील दोन्ही गट आणि चार पंचायत समितींवर शिंदेसेनेने वर्चस्व मिळविले आहे. दापोलीतील सर्व सहाही गटांवर शिंदेसेना आणि १२ गणांपैकी १० जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप या पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. खेड तालुक्यात ७ गटांपैकी ६ वर शिंदेसेना आणि एक राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा उमेदवार निवडून आला. या तीनही ठिकाणी शिंदेसेना स्वतंत्र लढली होती. तेथे भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने युती केली होती.चिपळूणमध्ये ९ गटांमध्ये शिंदेसेनेचे ३, भाजप २, राष्ट्रवादी (अजित पवार) ३ आणि उद्धवसेनेचा १ उमेदवार निवडून आला आहे. १८ गणांमध्ये शिंदेसेना आणि उद्धवसेना प्रत्येकी ४, भाजप ३ आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) ७ उमेदवार निवडून आले. येथे सद्य:स्थितीत त्रिशंकू स्थिती आहे. स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सर्वाधिक ७ उमेदवार निवडून आले आहेत.गुहागरमध्ये ५ गटांमध्ये शिंदेसेना २ आणि भाजप, उद्धवसेना आणि अपक्ष एक उमेदवार विजयी झाले. १० गणांमध्ये शिंदेसेनेचे ५, भाजपचे ४ आणि उद्धवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला. येथेही युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.संगमेश्वर तालुक्यातील ७ गटांमध्ये उद्धवसेना ३, शिंदेसेना २ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. १४ गणांमध्ये शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रत्येकी चार आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून आले.रत्नागिरी तालुक्यातील १० गटांमध्ये सर्वच शिंदेसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर २० गणांमध्ये १८ शिंदेसेना आणि २ भाजप उमेदवार विजयी झाले. येथे उद्धवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. राजापूर तालुक्यात सहाही गटांमध्ये आणि १० गणांमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार निवडून आले आणि तर भाजप आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. लांजा तालुक्यातील ४ गट आणि ७ गणांमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार विजयी झाले. उर्वरित एका गणावर भाजपने विजय मिळवला आहे.
Web Summary : Shinde Sena swept Ratnagiri ZP elections, securing 41 of 56 seats. Uddhav Sena and NCP (Ajit Pawar) followed. MNS gained a seat, while Congress and NCP (Sharad Pawar) failed to score.
Web Summary : शिंदे सेना ने रत्नागिरी ZP चुनावों में 56 में से 41 सीटें जीतकर दबदबा बनाया। उद्धव सेना और राकांपा (अजित पवार) दूसरे स्थान पर रहे। मनसे ने एक सीट जीती, जबकि कांग्रेस और राकांपा (शरद पवार) विफल रहे।