शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरी : रेल्वेचा वेग पावसाळी वेळापत्रकापूर्वीच मंदावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 14:11 IST

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून लागू होत असले तरी यादरम्यान कोकण आणि मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पावसाळी वेळापत्रक लागू होण्याअगोदरच रेल्वेचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देरेल्वेचा वेग पावसाळी वेळापत्रकापूर्वीच मंदावणार? पुढील तीन दिवसात अतिवृष्टी झाल्यास ४० किमीपर्यंत वेग कमी होणार

विहार तेंडुलकररत्नागिरी : कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून लागू होत असले तरी  यादरम्यान कोकण आणि मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पावसाळी वेळापत्रक लागू होण्याअगोदरच रेल्वेचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.कोकणात गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसाच्या तुलनेत पुढील तीन दिवस जादा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने कोकण रेल्वेचा वेग काही ठिकाणी ४० किमी प्रतितास एवढा होऊ शकतो. हा वेग आताच्या वेगापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडू शकते.

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जून ते ३१ आॅक्टोबर या काळात अंमलात राहणार आहे. यादरम्यान कोकण रेल्वेचा वेग हा १००वरून ७५-९० किमी प्रतितास असा राहणार आहे. कोकणातील पावसाचे आगमन लक्षात घेऊन कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रकासाठी हा काळ निवडला आहे. मात्र, अवकाळी पावसाने १ जूनपासूनच जोरदार बॅटिंग सुरु केली आहे.

आता लवकरच मान्सूनही सक्रिय होणार असून, त्यामुळे पावसाची बरसात पुढील काही दिवस अशीच राहणार आहे. मात्र, हवामान खात्याने  तीन दिवसांसाठी मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत तर गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे, असा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हा इशारा ध्यानी घेता कोकण रेल्वेला १० जूनपूर्वीच आपला वेग कमी करावा लागणार, असे सध्याचे चित्र आहे. कोकण रेल्वेचा सध्याचा वेग हा जास्तीत जास्त ११० ते १२० किमी प्रतितास एवढा असतो. पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यानंतर म्हणजेच, १० जूनपासून हा वेग तासी ७५ ते ९० किमी एवढा राहणार आहे.

अतिवृष्टी झाल्यास हा वेग त्या त्यावेळी ४० किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. तशा सूचना रेल्वे प्रशासनातर्फे संबंधितांना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार, हा वेग १० तारखेपूर्वीच कमी करावा लागणार, अशी चिन्ह आहेत.

हवामान खात्याने पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास कोकण रेल्वेचा वेग हा पावसाळी वेळापत्रकापूर्वी म्हणजेच १० जूनपूर्वी कमी होऊ शकतो. अगदी अतिवृष्टी झाल्यास वेग ४० किलोमीटर प्रतितास एवढा कमी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या-त्यावेळी मान्सूनच्या स्थितीनुसार कोकण रेल्वेच्या वेगाबाबतचा निर्णय घेतला जाईल.- एल. के. वर्मा,मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

प्रशासनाकडून इशारादिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळीवारा आणि विजांच्या गडगडाटासह हा पाऊस बरसणार असून, जनतेने सावधानता बाळगावी, अतिवृष्टीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.रेल्वेगाड्या १५-६० मिनिटे उशिरागतवर्षीच्या तुलनेत यंदा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर फारसा परिणाम झालेला नाही. गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या या १५ ते २० मिनिटे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या ५० ते ६० मिनिटे उशिराने धावत होत्या. गेल्यावर्षी दीड ते दोन तास रेल्वे उशिराने धावत होत्या 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी