कोकण रेल्वे होणार आता धिमी. 10 जून पासून नवीन वेळापत्रक, पावसाळी हंगामासाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:26 PM2018-06-06T15:26:20+5:302018-06-06T15:26:20+5:30

कोकण रेल्वेने पावसाळी हंगामासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे काहीशी धिमी होणार असून वेग मंदावणार आहे.

Konkan Railway will now be Dhimi New schedule, planning for rainy season from June 10 | कोकण रेल्वे होणार आता धिमी. 10 जून पासून नवीन वेळापत्रक, पावसाळी हंगामासाठी नियोजन

कोकण रेल्वे होणार आता धिमी. 10 जून पासून नवीन वेळापत्रक, पावसाळी हंगामासाठी नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देकोकण रेल्वे होणार आता धिमी, 10 जून पासून नवीन वेळापत्रक पावसाळी हंगामासाठी नियोजन

सुधीर राणे

कणकवली - कोकण रेल्वेने पावसाळी हंगामासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे काहीशी धिमी होणार असून वेग मंदावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांचे पावसाळी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (अप) : सावंतवाडी 8.30, झाराप 8.42,कुडाळ 8.53, सिंधुदुर्ग 9.04,कणकवली 9.20, नांदगाव 9.35, वैभववाडी 9.57.

दिवा-सावंतवाडी (डाऊन) : वैभववाडी 15.10, नांदगाव 15.24, कणकवली 15.45, सिंधुदुर्ग 16.03, कुडाळ 16.23 , झाराप 16.36, सावंतवाडी 17.10.

मांडवी एक्‍स्प्रेस (अप) : सावंतवाडी9.41, कुडाळ 10.30, सिंधुदुर्ग 10.42, कणकवली 11.01, वैभववाडी 11.31.
मांडवी एक्‍स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 16.56, कणकवली 17.30, सिंधुदुर्ग 17.48, कुडाळ 18.02, सावंतवाडी 18.21. जनशताब्दी (अप) : मडगाव 12.00, कुडाळ 14.00, कणकवली 14.30, रत्नागिरी 16.30, दादर 23.05. जनशताब्दी (डाऊन) : दादर 5.25, रत्नागिरी 11.05, कणकवली 13.30, कुडाळ 14.02, मडगाव 16.20 .तुतारी एक्‍स्प्रेस (अप) : सावंतवाडी 17.30, कुडाळ 17.54, सिंधुदुर्ग 18.08, कणकवली 18.28, नांदगाव 18.42, वैभववाडी 19.00.
तुतारी एक्‍स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 8.48, नांदगाव 9.10, कणकवली 9.30, सिंधुदुर्ग 10.02, कुडाळ 10.30, सावंतवाडी 12.00, मुंबई एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 21.40, कणकवली 23.56, सीएसटी 10.33. मंगलोर (डाऊन) : सीएसटी 22.02, कणकवली 6.40, मडगाव 8.50 .

मंगला एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 1.25, कणकवली 3.32, कल्याण 13.40. (डाऊन) : कल्याण : 8.32, कणकवली 17.20, मडगाव 19.30.मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 19.05, कुडाळ 20.52, ठाणे 5.53.

मत्स्यगंधा एक्सप्रेस (डाऊन) ठाणे : 15.42, कुडाळ 00.54, मडगाव 2.45. नेत्रावती (अप) : मडगाव 5.50, कुडाळ 08.00 ठाणे 17.01. (डाऊन) : ठाणे 12.05, कुडाळ 21.28, मडगाव 23.15. अशी गाड़यांची नवीन वेळ आहे.


धोकादायक ठिकाणी गस्त !

पावसाळ्याच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर काही ठिकाणी दरड तसेच माती कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे सेवा काही कालावधी साठी ठप्प होत असते . त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पावसाळ्या पूर्वीच धोकादायक दरडी कटिंग केल्या आहेत.

मात्र ,तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वच धोकादायक ठिकाणी रेल्वे ट्रेकमॅन तसेच इतर कर्मचारी चोवीस तास गस्त घालणार आहेत. त्यामुळे दरड कोसळण्यासारखी कोणतीही घटना घडल्यास रेल्वे प्रशासनाला तत्काळ माहिती समजू शकणार आहे. तसेच तत्काळ उपाययोजनाही करता येणार आहेत.
 

Web Title: Konkan Railway will now be Dhimi New schedule, planning for rainy season from June 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.