कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

By admin | Published: April 21, 2015 11:37 PM2015-04-21T23:37:01+5:302015-04-22T00:25:58+5:30

वेळा बदलल्या : १० जूनपासून होणार अंमलबजावणी

Announcement of rainy season of Konkan Railway | कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

Next

रत्नागिरी : पावसाळा लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी १० जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन गाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे रेल्वेला पावसाळी वेगळे वेळापत्रक जाहीर करावे लागते. यंदाही कोकण रेल्वेने हे वेळापत्रक जाहीर केले असून, १० जूनपासून ते अमलात येणार आहे. ज्या प्रवाशांनी पावसाळ्याच्या काळासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण केले आहे, त्यांनी आरक्षण तिकिटावरील रेल्वेची सुटण्याची वेळ आताच तपासून पाहावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ११००४ सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्स्प्रेस सध्या सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटते ती पावसाळ्यात ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. १२६१७ एर्नाकुलम - निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस ही एर्नाकुलम येथून दुपारी १ वाजून ५ मिनिटानी सुटते ती सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. १२०५२ मडगाव - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटते ती आता १२ वाजता सुटेल. १२६२० मेंगलोर - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही दुपारी २.४० वाजता सुटते ती आता दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल.
१०११२ मडगाव - छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही मडगाव येथून सायंकाळी ६ वाजता सुटते ती आता सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल. २२९०७ मडगाव - हाप्पा एक्स्प्रेस ही मडगाव येथून सकाळी १०.४० वाजता सुटते ती सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. १२७४१ वास्को - पाटणा एक्स्प्रेस ही वास्को येथून सायंकाळी ७.४५ वाजता सुटते, त्याऐवजी ती सायंकाळी ६ वाजता सुटेल.
१०२१५ मडगाव - एर्नाकुलम एक्स्प्रेस ही रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटते ती आता ९ वाजता सुटेल. १२४४९ मडगाव - चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस ही सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सुटते ती आता दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी सुटेल.
१२१३४ मेंगलोर - छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही मेंगलोर येथून दुपारी २ वाजता सुटते ती आता सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. १६५२४ कारवार यशवंतपूर एक्स्प्रेस दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी कारवार येथून सुटते ती आता २ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे.
५०१०१ रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर गाडी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी रत्नागिरीतून सुटते ती आता मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ५०१०६ सावंतवाडी - दिवा पॅसेंजर गाडी ही सावंतवाडी येथून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सुटते ती आता ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे.
५६६४१ मडगाव - मेंगलोर पॅसेंजर ही मडगाव येथून दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुटते ती आता दुपारी २ वाजता सुटणार आहे. ५०१०२ मडगाव - रत्नागिरी पॅसेंजर गाडी रात्री ७.४० वाटते मडगाव येथून सुटते ती १० जूनपासून रात्री ८ वाजता सुटणार आहे. (प्रतिनिधी)



कोकण रेल्वेने यावर्षी आपले वेळापत्रक दीड महिने अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आतापर्यंत पावसाळ्याच्या काळात आरक्षण केले आहे, त्यांना त्यांच्या बदलत्या रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती घ्यावी लागणार आहे.

Web Title: Announcement of rainy season of Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.