रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 13:19 IST2018-10-10T13:16:28+5:302018-10-10T13:19:20+5:30
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

रत्नागिरीत भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. साखरपानजीक दाभोळे येथे इर्टिगा कार (एमएच १२/पीटी ७६४१) झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून चारही जणांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेले आणि जखमींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.