शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

रत्नागिरी : स्वाभिमान - शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी?, नीलेश राणे यांच्या ट्विटला उदय सामंतांचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 4:08 PM

शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.

ठळक मुद्देस्वाभिमान - शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी?नीलेश राणे यांच्या ट्विटला उदय सामंतांचे उत्तर

रत्नागिरी : शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.

गतमहिन्यात एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात स्वाभिमान आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. जैतापूर प्रकल्पाला आमदार उदय सामंत यांचा पाठिंबा असल्याचा एक व्हिडिओ एका कार्यकर्त्याने दाखवला.

 

 

स्वाभिमान पक्षाचा तो असल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे केशकर्तनालय काही लोकांनी फोडले. या प्रकरणात स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हा वाद अजूनही धुमसत आहे.

निवडणुकीपर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून हा वाद सुरूच राहील, असे स्पष्ट दिसत आहे. घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डरला नोटीस काढणार असल्याचे उद्गार म्हाडाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत काढले होते. मुंबईतील लोढा बिल्डर्सने पैसे भरूनही लाभार्थींना घरांचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे हा ताबा लगेचच देण्यासाठी त्यांना म्हाडाकडून नोटीस काढण्यात येईल, असे आमदार सामंत यांनी सांगितले.माजी खासदार नीलेश राणे यांनी याच वक्तव्याचा आधार घेत ट्वीटरवर चांगलाच समाचार घेतला होता. बिल्डरना नोटीस देऊन पैसे काढण्याची सवय असलेल्या शिवसेना आमदाराविरोधात आपण लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले. राणे यांनी केलेल्या या ट्वीटचा उल्लेख न करता आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.चिपळूण येथे आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मुंबईमध्ये कल्याण - डोंबिवली येथे म्हाडामधील घरांसाठी अनेक लोकांनी पैसे भरले आहेत. मात्र, त्यांची घरे कोठे आहेत, हे त्यांनाच माहिती नाही. बिल्डरने त्यांना ही घरे दाखवलेलीच नाहीत.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या प्रकल्पाचे काम करत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. म्हाडाची घरे ही सर्वसामान्य लोकांसाठीची असल्याने आपण म्हाडाकडून ही नोटीस पाठवली आहे. हे सांगतानाच आमदार सामंत यांनी आपण शिवसेनेचे आमदार असल्याने कोणाला घाबरत नसल्याची पुष्टीही जोडली आहे.शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच राहणाररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नीलेश राणे निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरीतील मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी रत्नागिरीतील घडामोडी विशेषत: शिवसेनेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. निवडणुकीपर्यंत शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Twitterट्विटरRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतNilesh Raneनिलेश राणे