शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एकतेचा संदेश देत कोस्टल मॅरेथॉनमधून धावली रत्नागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:35 PM

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी सकाळी कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांनी एकतेचा संदेश दिला. सुमारे ४ हजार रत्नागिरीकरांनी शनिवारी पहाटे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आपला उत्साह दाखवून दिला.

ठळक मुद्देएकतेचा संदेश देत कोस्टल मॅरेथॉनमधून धावले ४ हजार रत्नागिरीकरपुरूषांमध्ये अविनाश पवार, मुलींमध्ये शर्मिला कदम प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी सकाळी कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांनी एकतेचा संदेश दिला. सुमारे ४ हजार रत्नागिरीकरांनी शनिवारी पहाटे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आपला उत्साह दाखवून दिला.

या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर पुरूष गटातून अविनाश पवार तर महिला गटातून शर्मिला कदम विजयाचे मानकरी ठरले. यासह ७५ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक वसंत कर्लेकर यांनी २१ किलोमीटर अंतर पार करून तरूणाईसमोर एक आदर्श घालून दिला. मंडणगड येथील घराडी अंध विद्यालयाच्या प्रतिनिधींनीही पूर्ण केलेली ड्रीम रनचेही साऱ्यांनी कौतुक केले.युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया असे ब्रीद वाक्य ठेवून आयोजित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये सर्व समाजातील बांधव सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचा शुभारंभ माजी एअर चिफ मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश आनंद सामंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, बांधकाम विभाग अभियंता जयंत कुलकर्णी, अमृता मुंढे, संदीप तावडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू संपदा धोपटकर, ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, आकांक्षा कदम यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जाणीव फौंडेशन, रोटरी क्लब, रत्नदुर्ग मौंटेनियर्स, लायन्स क्लब, क्रीडा असोसिएशन, वीरश्री ट्रस्ट, रत्नागिरी पत्रकार, जिद्दी माऊंटेंनियअर्स, क्रिडाई, मँगो इव्हेंट, अरिहंत ग्रुप, जेएसडब्लू, फिनोलेक्स, आयएमए, मुकुल माधव फाऊंडेशन, ओमसाई डेकोरेटर, जायंटस ग्रुप आदी विविध संस्थांसह नागरिकांचे मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले होते.त्यांनी वेधले साऱ्यांचेच लक्षमॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपल्यानंतर शेवटी दाखल झालेल्या एका स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तरूणांनादेखील लाजवले असा या स्पर्धकाचा जणू थाट होता. या स्पर्धकाचे नाव होते. वसंत हरी कर्लेकर आणि त्यांचे वय होते ७५ वर्षे. त्यांनी तब्बल २१ किलोमीटर धावून स्पर्धा पूर्ण केली.

बक्षीस समारंभ उरकल्यावर सुमारे अर्ध्या तासाने ते स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाले आणि सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरला. पोलीस दलाने पुरेपूर काळजी घेत धावताना त्यांच्या सोबत एका गाडीची व पोलिसांची व्यवस्था ठेवली होती.मॅरेथॉनचा निकाल

  • २१ किलोमीटर : प्रथम क्रमांक - अविनाश पवार, द्वितीय क्रमांक - अक्षय पडवळ, रोहित बडदे,
  • महिला गट : प्रथम - शर्मिला कदम, द्वितीय क्रमांक - प्रिया शिंदे.
  • १० किलोमीटर :पुरूष प्रथम क्रमांक - मयुर चांदिवडे, द्वितीय क्रमांक - सिध्देश भुवड, तृतीय क्रमांक - सिध्देश कानसे,
  • महिला गट :प्रथम क्रमांक - दिव्या भोरे, द्वितीय - सीमा मोरे, तृतीय - दर्शना शिंदे
  • ५ किलोमीटर पुरूष गट : प्रथम क्रमांक - संकेत भुवड, द्वितीय - सोहम पवार, तृतीय - प्रथमेश उदगे,
  • महिला : प्रथम क्रमांक - रोहिणी पवार, द्वितीय क्रमांक - श्रृती गिजबिले, तृतीय - विद्या चव्हाण.
  • ३ किलोमीटर मुले : प्रथम क्रमांक - रूद्र सदावते, द्वितीय क्रमांक - किरण माळी, तृतीय क्रमांक - श्रवण गवाणकर.
  • मुली : प्रथम क्रमांक - स्वरांजली कर्लेकर, द्वितीय क्रमांक - सानिका काळे, तृतीय क्रमांक - त्रिशा मयेकर.
टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी