रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेडस् ॲप’चा अन्य जिल्ह्यांनाही फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:51 IST2026-03-28T13:50:42+5:302026-03-28T13:51:48+5:30

रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे तयार करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘रेडस् ॲप’ गुन्हे तपास कामात अत्यंत प्रभावी ...

Ratnagiri Police's Rads App benefits other districts too | रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेडस् ॲप’चा अन्य जिल्ह्यांनाही फायदा 

रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेडस् ॲप’चा अन्य जिल्ह्यांनाही फायदा 

रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे तयार करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘रेडस् ॲप’ गुन्हे तपास कामात अत्यंत प्रभावी व आधुनिक तांत्रिक मदत मिळत आहे. या ॲपचा उपयाेग जिल्हा पाेलिस दलाबराेबरच राज्यातील नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील पाेलिस दलालाही मदत झाली आहे.

जिल्हा पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून दि. १५ डिसेंबर २०२५ राेजी एआय आधारित ‘रेडस् ॲप’ तयार केले आहे. हे तंत्रज्ञान विशेषत: जिल्हा पाेलिस दलासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या साहाय्याने जिल्ह्यातील पाहिजे किंवा फरार आराेपी तसेच हरविलेल्या व्यक्तींचे विविध एकूण १०८ प्रकारे अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने पुनर्निर्मित करण्यात येत आहेत. यामुळे संशयित व्यक्तींची ओळख पटविणे, त्यांचा मागाेवा घेणे तसेच तपास अधिक परिणामकारक व वेगवान करणे शक्य झाले आहे.

या अत्याधुनिक ‘रेडस ॲप’ तंत्रज्ञानाचा उपयाेग राज्यातील नागपूर, सातारा, पालघर तसेच अहिल्यानगर जिल्हा पाेलिस दलांनाही हाेत आहे. या पाेलिस दलाला अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे, रेखाचित्रांचे पुनर्निर्माण करणे या कामात साहाय्य ठरले आहे.

ओळख पटविण्यासाठी मदत

या ॲपच्या माध्यमातून अज्ञात मृतदेह प्रकरणांमध्ये, विशेषत: चेहरा विद्रुप झालेल्या किंवा ओळख पटविण्यास कठीण असलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मृतदेहांची ओळख पटविण्यास माेठ्या प्रमाणात मदत हाेत आहे.

या प्रकरणात पाेलिसांना मदत

अहिल्यानगर पाेलिस स्थानकात दाखल असलेल्या ॲसिड फेकल्याच्या प्रकरणातील संशयिताच्या रेखाचित्रावरून फाेटाे तयार करण्यात आला. पालघर, सातारा आणि नागपूर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद असलेल्या मृतदेहांचे फाेटाे तयार करण्यात आले. या मृतदेहांचे चेहरे विद्रुप झालेले हाेते. मात्र, ॲपच्या माध्यमातून त्यांची ओळख पटविण्यास मदत झाली.

Web Title : रत्नागिरी पुलिस के 'रेडएप' से अन्य जिलों को भी अपराध जांच में लाभ।

Web Summary : रत्नागिरी पुलिस के एआई-पावर्ड 'रेडएप' से अपराध जांच में मदद मिलती है, जिससे नागपुर, सतारा, पालघर और अहिल्यानगर पुलिस को फायदा हुआ है। यह संदिग्धों और लापता व्यक्तियों की छवियों का पुनर्निर्माण करता है, जिससे पहचान और तेजी से जांच में मदद मिलती है, खासकर अज्ञात मृतकों से जुड़े मामलों में।

Web Title : Ratnagiri Police's 'RedApp' benefits other districts in crime investigation.

Web Summary : Ratnagiri Police's AI-powered 'RedApp' aids crime investigation, benefiting Nagpur, Satara, Palghar, and Ahilyanagar police. It reconstructs images of suspects and missing persons, helping in identification and faster investigations, particularly in cases involving unidentified deceased individuals.