शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

रत्नागिरी : ९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित, कशेळीतील कनकादित्य सूर्यमंदिरात जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 5:48 PM

कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले.

ठळक मुद्दे९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित कशेळीतील कनकादित्य सूर्यमंदिरात जागतिक विक्रमआजी घालतात रोज ४० नमस्कार!पुणेरी पगडी देऊन सन्मानअविनाश अनपटचे २०१८ नमस्कार

रत्नागिरी : कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले.

या उपक्रमातून १ लाख ७५ हजार सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. २० शाळांतील १८०० विद्यार्थी आणि नागरिकांनी आदित्ययागातून हा पराक्रम केला आहे.२४ तासांत साखळी पद्धतीने सूर्यमंदिरात १ लाख ५१ हजार सूर्यनमस्कारांचा पराक्रम करण्यात आला. रत्नागिरी शहरातील शाळांसह फणसोप, पावस, पूर्णगड, कशेळी, आडिवरे व राजापूर येथील २० शाळांनी सहभाग घेतला.आदित्ययागामध्ये सूर्यनमस्कार समंत्र होते. सौरसूक्त पठण- १०८ आहुती, नवग्रह पूजन, अखंड सूर्यनमस्कार, गुणदर्शन कार्यक्रम, ७००० दिव्यांचा दीपोत्सव असे कार्यक्रम रंगले.

सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देण्यात आली. सूर्यनमस्कार उपक्रमाच्या प्रचार, प्रसारासाठी विश्वनाथ बापट यांनी प्रचंड मेहनत घेतली. शाळांमध्ये जाऊन सूर्यनमस्कार शिकवले.पटवर्धन हायस्कूलचे संजीवन गुरुकुल, जीजीपीएसचे बाबुराव जोशी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. कलातीर्थ संगीत विद्यालयार्फे काढलेली सूर्याची रांगोळी लक्षवेधी ठरली. तसेच मंदिरातर्फे कनकादित्याची पालखी काढण्यात आली. सर्वांसाठी तो एक सुखद अनुभव ठरला.तसेच मंदिराचे विश्वस्त अप्पा ओळकर, डॉ. भागवत तसेच व्यवस्थापक, गुरुकुल प्रमुख किरण जोशी, राजेश आयरे यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य योग साधनेचे संस्थापक श्रीराम साठ्ये, प्रकाश धोकटे, सौरभ कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, अमोल काळे यांनी मेहनत घेतली.पुणेरी पगडी देऊन सन्मानसूर्यनारायणामुळे आपल्याला अन्न मिळते, त्याचे स्मरण करून रोज सूर्यनमस्कार घातलेच गेले पाहिजेत, तसे न झाले तर मी त्या दिवशी अन्नग्रहण करीत नाही, हा विचार बापट अनेक वर्षे आचरणात आणत आहेत. याबद्दल त्यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.आजी घालतात रोज ४० नमस्कार!कशेळी येथील सूर्यमंदिर सुमारे १ हजार वर्षे जुने आहे. १३ व १४ जानेवारी रोजी सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्षांच्या मुलांपासून ९९ वर्षांच्या ज्येष्ठांनीही यात नमस्कार घातले. कोळंबे येथील दामले आजी वयाच्या ९९ व्या वर्षी रोज ४० नमस्कार घालतात. आदित्ययागासाठी त्या आवर्जून उपस्थित राहिल्या. रत्नागिरीतील गणपुले यांच्यासमवेत जर्मन पाहुणे रॉगमन हेसुद्धा आवर्जून उपस्थित राहिले.अविनाश अनपटचे २०१८ नमस्कारचैतन्य योग साधनाच्या अविनाश अनपट याने पुरुष गटात २०१८ व मुलींच्या गटात अमृता गोरेने १०५८ व महिलांच्या गटात गरुड यांनी ५४१ नमस्कार घातले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीYogaयोगHealthआरोग्य