आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 70 भारतीय शब्द, अण्णा, अच्छा, अब्बा, बच्चा, सूर्यनमस्कार जाणार जगभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 04:16 AM2017-10-27T04:16:37+5:302017-10-27T04:17:18+5:30

हैदराबाद : जगाच्या पाठीवरील भाषिक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीची दखल घेत सातत्याने नव-नवीन शब्दांची ओळख करून देणा-या ‘आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’च्या नव्या आवृत्तीत तेलगू, उर्दू, तामिळ, हिंदी आणि गुजराती या भारतीय भाषांतील ७० नवीन शब्दांचा समावेश केला आहे.

In the Oxford dictionary, there will be 70 Indian words, Anna, good, Abba, Child, Suryanamaska ​​all over the world. | आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 70 भारतीय शब्द, अण्णा, अच्छा, अब्बा, बच्चा, सूर्यनमस्कार जाणार जगभरात

आॅक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 70 भारतीय शब्द, अण्णा, अच्छा, अब्बा, बच्चा, सूर्यनमस्कार जाणार जगभरात

Next

हैदराबाद : जगाच्या पाठीवरील भाषिक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीची दखल घेत सातत्याने नव-नवीन शब्दांची ओळख करून देणा-या ‘आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’च्या नव्या आवृत्तीत तेलगू, उर्दू, तामिळ, हिंदी आणि गुजराती या भारतीय भाषांतील ७० नवीन शब्दांचा समावेश केला आहे. ‘अण्णा, अब्बा, अच्छा, बापू, बडा दिन, सूर्यनमस्कार, बच्चा’ यासह नातेसंबंध, संस्कृती व खाद्यपदार्थांशी संबंधित भारतीय भाषांतील ७० नवीन शब्दांचा महिनाभरापूर्वीच आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या ताज्या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे.
आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत भारत व पाकिस्तानचे चलन एकक म्हणून ‘आणा’ हा शब्द आधीच या डिक्शनरीत अस्तित्वात आहे. आता तेलगू आणि तामिळ भाषेत थोरल्या भावाचा आदराने उल्लेख करणाºया ‘अण्णा’ या शब्दाचाही (नाम) समावेश करण्यात आला आहे.
‘अच्छा’ या हिंदी शब्दासाठी डिक्शनरीत ‘ओके’ हा शब्द आहे. तथापि, नवीन आवृत्तीत अच्छा या शब्दाचे तात्पर्य आश्चर्य, संशय आणि आनंद व्यक्त करण्याच्या भावनेशी असेल. अच्छा हा शब्द हिंदीत प्रश्नाच्या स्वरूपातही विचारला जात असल्याचा तो परिणाम असावा. उर्दूतील ‘अब्बा’ म्हणजे वडीलही डिक्शनरीमध्ये गेले आहेत.
‘भारतीय इंग्लिश’ यावर डॅनिका सॅलझर (आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी- संपादक) यांनी म्हटले आहे की, यापूर्वी आॅक्सफर्ड डिक्शनरीत भारतीय भाषांतील ९०० शब्दांचा समावेश होता. आता आणखी नवीन ७० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय भाषांत शिष्टाचाराच्या अनुषंगाने पत्ता, वय, लिंग, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या दृष्टीने विशिष्ट शब्द वापरले जातात. तथापि, इंग्रजीत या शब्दांना समकक्ष शब्द नाहीत. त्यामुळे नवीन शब्दांचा त्या-त्या भारतीय भाषेतील रूढ अर्थासह या विशेष शब्दावलींचा समावेश करून या शब्दकोशातील उणीव भरून काढण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
एकूण एक हजार शब्द समाविष्ट
२०१७ सप्टेंबरमध्ये आॅक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत १,००० नवीन शब्द, अर्थ आणि रूपांचा समावेश करण्यात आला आहे, असे आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने नवीन शब्दांच्या समावेशासंदर्भातील टिपणात म्हटले आहे.

Web Title: In the Oxford dictionary, there will be 70 Indian words, Anna, good, Abba, Child, Suryanamaska ​​all over the world.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.