शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रत्नागिरी : गणपतीसाठी २२२५ जादा गाड्या येणार, कोकणसाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 2:41 PM

कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देगणपतीसाठी ८ सप्टेंबरपासून २२२५ जादा गाड्या येणारराज्य परिवहन महामंडळाचे कोकणसाठी नियोजन

रत्नागिरी : कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.गतवर्षी २२१६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात २०७२ जादा गाड्या कोकणात आल्या. यावर्षी गणेश चतुर्थी १३ सप्टेंबरला असल्यामुळे दि. ८ सप्टेंबरपासून या गाड्या मुंबई, ठाणे, पालघर प्रदेशातून सुटणार आहेत. मुंबईतून ग्रुप बुकिंगच्या ८९०, आरक्षणाच्या २३५ मिळून एकूण ११२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ठाणेतून ग्रुप बुकिंगच्या ५२७, तर आरक्षणाच्या ३५१ मिळून ८७८, तर पालघर येथून ग्रुपच्या १६६ व आरक्षणाच्या ६६ मिळून २२२ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ग्रुप बुकिंगच्या १५८३ व आरक्षणाच्या ६४२ मिळून २२२५ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिक प्रदेशातून १७५० बसेस चालक/वाहकांसह जादा वाहतुकीसाठी पुरविण्यात येणार आहेत.गणेशोत्सवात महामार्गावरील होणारी गर्दी व त्या कालावधीत एस. टी.चा बिघाड झाल्यास प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, याकरिता ठाणे विभागाचे दुरूस्ती पथक इंदापूर, रायगडचे पथक कशेडी येथे, तर रत्नागिरीचे पथक संगमेश्वर व सिंधुदुर्गचे प्रथक तरळा येथे कार्यरत राहणार आहे. याव्यतिरिक्त पेण, नागोठणे, माणगाव, महाड, खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली कार्यशाळा रात्री सुरू ठेवण्यात येणार आहे.महामंडळाच्या वैध उत्पन्नाला कोणत्याही प्रकारे बाधा निर्माण होऊ नये, यासाठी रायगड व रत्नागिरी विभागाची गस्ती पथके दोन्ही बाजूला दि. ८ ते १३ सप्टेंबरपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत. याशिवाय पुणे विभागाचे मार्ग तपासणी पथक पनवेल ते पोलादपूर, साताऱ्याचे पथक पोलादपूर ते राजापूर, कोल्हापूर विभागाचे पथक राजापूर ते सावंतवाडी मार्गावर तपासणी करणार आहे.गु्रप बुकिंगसाठी आरक्षण सुरू झाले आहे, तर १७ सप्टेंबरचे आरक्षण दि. ८ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. दि. ८ सप्टेंबरचे आरक्षण दि. ९ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल, उरण, ठाणे-१, ठाणे-२, विठ्ठलवाडी, कल्याण, पालघर, वसई, अर्नाळा बसस्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रत्नागिरी विभागाने नियोजन सुरू केले आहे. जादा गाड्यांसमवेत चेकपोस्ट गस्तीपथके तैनात करण्यात येणार आहेत. गस्तीपथक कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते राजापूरपर्यंत कार्यरत असणार आहे. याशिवाय दुरूस्तीपथकदेखील असणार आहे. चिपळूण शिवाजीनगर व संगमेश्वर बसस्थानक येथे तपासणी केंद्र उभारले जाणार आहे.संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र, तर चिपळूण शिवाजीनगर मार्गावर क्रेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. ८ ते १३ सप्टेंबरपर्यंत २२२५ गाड्यातून मुंबईकर येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक गाड्या येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर परतीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गतवर्षी १४१४ गाड्या परतीसाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी त्यापेक्षा अधिक गाड्या जाण्याची शक्यता आहे. याशिवाय दररोज १५० गाड्या धावत आहेत. प्रवाशांसाठी लवकरच आॅनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.कोकण रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रत्नागिरी बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्या रेल्वे स्थानक मार्गे वळविण्यात येणार आहेत. चिपळूण, खेड, संगमेश्वर रेल्वेस्थानकांसाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाबरोबर अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार असून, उत्सव कालावधीतील सुट्ट्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी दिली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीkonkanकोकणstate transportराज्य परीवहन महामंडळ