शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:47 IST2025-07-30T16:47:46+5:302025-07-30T16:47:46+5:30
Ratnagiri pharmacy student Suicide News: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली.

शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिपळून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरवात केली आहे. सगळे व्यवस्थित सुरू असतानाही मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
ओवेस जुलफीकार मुल्ला (वय, २२) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ओवेस हा फार्मसीचे शिक्षण घेत होता आणि कुटुंबासह चिपळूण शहरातील वाणी अळी येथे एकता अपार्टमेंटमध्ये राहत होता. तर, ओवेसचे वडील डॉ. जुलफीकार जमीर मुल्ला हे चिपळूणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ओवेस घरातील शौचालयात गेला. परंतु, बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने कुटुंब चिंतेत पडले. त्यांनी ओवेसला बाहेरून आवाज दिला. परंतु, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यावेळी ओवेस हा शौचालयातील लोखंडी ग्रीलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती चिपळून पोलिसांनी दिली.
सगळे व्यवस्थित सुरू असताना ओवेसने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या मृत्यूने कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.