रत्नागिरीनजीक दुचाकी-डंपर अपघातात स्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:53 IST2019-01-15T15:52:34+5:302019-01-15T15:53:15+5:30
नजीकच्या एमआयडीसी कंचन हॉटेल चौकाजवळ जवळ दुचाकी आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हि घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. प्रसन्न भंडारे (कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

रत्नागिरीनजीक दुचाकी-डंपर अपघातात स्वार ठार
रत्नागिरी - नजीकच्या एमआयडीसी कंचन हॉटेल चौकाजवळ जवळ दुचाकी आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. हि घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. प्रसन्न भंडारे (कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डंपर आणि दुचाकी हि दोन्ही वाहने एकाच दिशेला चालली होती.कांचन हॉटेलकडे जाणाऱ्या फाट्यावर दुचाकी डंपरच्या मागच्या चाकाखाली आली आणि या अपघातात स्वार भंडारे जागीच ठार झाले. या अपघाताबाबत अधिक तपशील कळू शकला नाही.
मिऱ्या कोल्हापूर महामार्गावर कांचन हॉटेल चौक हे ठिकाण अपघातग्रस्त म्हणून ओळखले जाते कारण. याठिकाणी परिवहन कार्यालयकडून येणारा तसेच कांचन हॉटेलकडून येणारा मार्ग मुख्य महामार्गाला मिळतात.