Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:50 IST2025-06-14T15:49:34+5:302025-06-14T15:50:54+5:30

आईला अजूनही आस

Rashni Rajendra Songhare of Mandangad died in a plane crash in Ahmedabad | Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू

Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू

मंडणगड : लंडन येथे जाण्यासाठी राेशनी राजेंद्र साेनघरे (२७) ही आई-वडिलांचा निराेप घेऊन निघाली हाेती. मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत तिचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आणि तिने आई-वडिलांचा घेतलेला ताे निराेप अखेरचा ठरला. मुंबईतील डाेंबिवली येथे राहणारी राेशनी मूळची मंडणगड तालुक्यातील बुरी येथील राहणारी असून, तिच्या जाण्याने बुरी गावावरही शाेककळा पसरली आहे.

आई राजेश्री, वडील राजेंद्र, भाऊ विघ्नेश यांच्या समवेत ती डोंबिवली येथे वास्तव्याला होती. लहानपणीच तिने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न बाळगले हाेते. मुंबईमध्ये शिक्षण घेतलेली राेशनी सन २०२१ मध्ये ती स्पाइस जेटमध्ये नोकरीला लागली हाेती. तिथे दोन वर्षे सेवा केल्यानंतर २०२४ मध्ये ती एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. इन्स्टाग्रामवर रोशनी हिचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ती एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर आहे. अहमदाबाद येथील अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे कळताच मर्चंट नेव्हीमध्ये असलेला भाऊ व वडील तातडीने अहमदाबादला रवाना झाले हाेते.

सोशल मीडियावर वावर

हवाई सुंदरी म्हणून काम करण्याबरोबर रोशनी समाजमाध्यमात विशेष प्रसिद्ध होती. इन्स्टाग्रामवर रोशनीचे ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, ती एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे.

गावाशी आजही घट्ट नाते

सोनघरे कुटुंब मुंबईत वास्तव्यास असले तरी बुरी गावाशी त्यांचे नाते आजही घट्ट आहे. दोन दिवसांपूर्वीच देवीच्या उत्सवासाठी ती गावी आली होती. अधिक सुटी नसल्याने देवीची ओटी भरुन ती मुंबईकडे गेली.

आईला अजूनही आस आहे

अपघाताची बातमी कळताच मर्चंट नेव्हीमध्ये असलेला भाऊ व वडील तातडीने अहमदाबादला रवाना झाले. अपघाताच्या धक्क्यातून तिची आई अद्याप सावरलेली नाही. आपली मुलगी सुरक्षित परत येईल, अशी आशा तिला अजूनही वाटत आहे.

मुलांना आवडीच्या क्षेत्रासाठी प्रोत्साहन

सोनघरे कुटंब सुरुवातीला मुंबईतील ग्रँड रोड परिसरात राहात होते. दोन वर्षापूर्वी हे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले. रोशनीचे वडील टेक्निशियन आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले. त्यामुळे रोशनीने हवाई क्षेत्रात, तर तिच्या भावाने मर्चंट नेव्हीमध्ये पाय रोवले.

Web Title: Rashni Rajendra Songhare of Mandangad died in a plane crash in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.