शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट पकडले

By admin | Updated: December 15, 2015 00:53 IST

दोघांना अटक; तिघे फरार : कोयनानगर येथे कारवाई

कोयनानगर : चिपळूणहून कऱ्हाडकडे कत्तलखाण्याच्या उद्देशाने पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट कोयनानगर येथे रविवार रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कोयना पोलिसांनी तस्करी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा नोंद केला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार झाले आहेत. दरम्यान, तस्करी केलेल्या पाळीव जनावरांना कराड करवडी येथील कृष्णा गोपालन संस्थेमध्ये सोडले आहे.़ याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि़ १३ रोजी रात्री दहा वाजता चिपळूणकडून कऱ्हाडकडे जाणारा ट्रक (एमएच०८ एच००६९) हा वेगाने निघाला असल्याचा संशय मनसेचे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांना आला असता त्यांनी दास्तन येथील टोलनाक्याजवळ ट्रक अडवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये १६ बैल आढळून आले़ त्यांनी तातडीने हा ट्रक कोयना पोलिसांच्या ताब्यात दिला. गत सप्ताहात याच ठिकाणी पाळीव जनावरांची तस्करी करणारे तीन टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊनही पाळीव जनावरांची तस्करी थांबली नसल्यामुळे या प्रकरणाला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप मनसे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांनी केला़ ही घटना समजताच विविध संघटनानंी कोयनानगर पोलीस ठाण्यात गर्दी केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता़ याप्रकरणी इमरान खेरटकर (वय २५), समसुद्दीन इस्माल खेरटकर (वय ३२, दोघेही रा़ रा़ खिर्डी, ता़ चिपळूण) यांना अटक करण्यात आली असून महम्मद बेलेकर, ट्रकमालक हुसेन खेरटकर व फारूक (पोलिसांना संपूर्ण नाव समजू शकले नाही.) हे फरार आहेत़ या सर्वांवर प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हवालदार दत्तात्रय डिसले तपास करत आहे़ (वार्ताहर)