शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनीला दंड

By admin | Updated: July 22, 2015 23:57 IST

वृध्द महिलेला लाभ : रत्नागिरीच्या ग्राहक मंचाचा निर्णय

रत्नागिरी : धार्मिक व संस्कृ ती पर्यटन कें द्र करुन देण्याच्या बहाण्याने रक्कम उकळून नंतर फसवणूक करणाऱ्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनी, पुणे या कंपनीला ९३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यामुळे गुहारमधील वृद्ध महिलेला लाभ मिळाला आहे.गुहागर चिखली येथील सुरेखा प्रकाश गोडांबे (६५) यांनी पुणे येथील लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि., पुणे संचालक अण्णासाहेब सुखदेव म्हस्के यांच्याविरोधात रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.औषधी वनस्पतींची लागवड आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे आरोग्य, धार्मिक, संस्कृती पर्यटन केंद्र करुन देण्याच्या बहाण्याने पुणे येथील लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि.चे संचालक म्हस्के यांनी गोडांबे यांच्याकडून २७ जुलै १४ रोजी रकमेची मागणी करुन रक्कम स्वीकारली होती व ६ ते ७ महिन्यांच्या कालावधीत सुरेखा गोडांबे यांचे जमिनीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करुन देतो, शास्त्रज्ञ मातीचा नमूना घेऊन परीक्षण करतील, तसेच कृ षी पर्यटन केंद्र सुरु करुन देतो, देशविदेशातील पर्यटक तुमच्या जमिनीमध्ये भेट देतील अशी स्वप्न दाखवून सहा महिन्यांच्या कालावधीत एक ते दीड लाख रुपये नफा मिळवून देतो, असे आमिष कंपनी संचालक म्हस्के यांनी वृद्ध महिला गोडांबे यांना दिले होते. त्यानंतर गोडांबे यांच्याकडून रक्कम स्वीकारल्यानंतर या आयुर्वेद कंपनीचे आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही.या बाबीने व्यथित होऊन अखेर गोडांबे यांनी रत्नागिरी येथील त्यांचे वकिल अ‍ॅड. मनिष चंद्रकांत नलावडे यांच्यामार्फ त रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार १३ जुलै १५ रोजी दाखल केली होती.लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि.चे संचालक म्हस्के यांच्याविरोधात सबळ पुरावा देण्यात येऊन तक्रारदार यांचे वकील अ‍ॅड. मनीष नलावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्षा पळसुले व सदस्य नाईकवडे यांच्या न्यायालयाने कंपनीचे ंसंचालक म्हस्के यांनी गोडांबे यांची फसवणूक केल्याने ८० हजारांची नुकसानभरपाई रक्कम घेतल्या दिनांकापासून ९ टक्के व्याजासह देण्याचे तसेच १० हजार रुपये मानसिक व शारीरिक त्रासापोटी द्यावेत, असा आदेश दिला आहे. तसेच गोडांबे यांनी तक्रार करण्यास भाग पाडून खर्चात पाडल्याबद्दल ३ हजार रुपये ४५ दिवसांचे आत देण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)औषधी वनस्पतीच्या लागवडीसह धार्मिक, संस्कृती पर्यटन केंद्र उभारण्याचे दिले होते आश्वासन.संचालकांनी वृध्द महिलेकडून रक्कम उकळली.सहा महिन्यात एक ते दीड लाखांचा नफा मिळवून देण्याचेही दिले होते आश्वासन.