Ratnagiri: एसटी बसमध्ये साप दिसताच प्रवाशांची उडाली घाबरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:23 IST2025-09-29T14:22:40+5:302025-09-29T14:23:10+5:30
Snake Inside ST Bus:

Ratnagiri: एसटी बसमध्ये साप दिसताच प्रवाशांची उडाली घाबरगुंडी
देवरुख: संगमेश्वर-बडदवाडी एसटी बसमध्ये साप आढळल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ झाला. बस सुरु होताच चालकाच्या शेजारी बसलेल्या मुलीला हा साप (Snake) दिसताच ती ओरडायला लागली. चालक, वाहक आणि धाडसी प्रवाशांनी त्या सापाला एसटी बसमधून बाहेर काढले. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
संमेश्वरातुन सुटलेली एसटी बस काही अंतर पुढे येताच गाडीत साप आढळला. यामुळे प्रवाशी गाडी थांबवा असे ओरडू लागले. हा साप बेलच्या दोरीला विळखा बसला होता. साप एसटीच्या दरवाज्यासमोर पुढे येताच एका धाडसी प्रवाशाने बेलच्या दोरीवरुन त्या सापाला काठीच्या सहाय्याने अलगद बाजुला रस्त्यावर उडविले अन् प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.