अर्धवट पुलामुळे वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:25+5:302021-07-22T04:20:25+5:30

राजापूर : तालुक्यातील ओणी - पाचल रोडवरील दैतवाडी मारुती मंदिर येथे सुमारे ७४ लाख रुपये खर्च करून नवीन पुलाचे ...

Partial bridges bother motorists | अर्धवट पुलामुळे वाहनचालकांना त्रास

अर्धवट पुलामुळे वाहनचालकांना त्रास

राजापूर : तालुक्यातील ओणी - पाचल रोडवरील दैतवाडी मारुती मंदिर येथे सुमारे ७४ लाख रुपये खर्च करून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पुलाच्या अपूर्ण कामामुळे माती व चिखल रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तर पूर्ण झाले आहे, परंतु पुलावर डांबरी रस्ता करायचा संबंधित ठेकेदार वा बांधकाम विभाग विसरून गेले आहेत. रस्त्यावर माती, दगड वर आल्याने संततधार पावसामुळे चिखल निर्माण झाला असून, त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. याठिकाणी गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत आणावा, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.

Web Title: Partial bridges bother motorists