शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध

By admin | Updated: February 18, 2015 23:45 IST

पुरोगामी विचारमंच : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

रत्नागिरी : ज्येष्ठ पुरोगामी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना अटक करा, नथुच्या वारसाचा धिक्कार असो, पुरोगामी विचारांवर हल्ला करणाऱ्यांचा धिक्कार असो, हिटलरशाही मुर्दाबाद, जातीयशक्ती मुर्दाबाद, अशा विविध घोषणा देत येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्रातील ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे प्राणघातक हल्ला झाला. दाभोलकरांच्या हत्येतून सावरत असतानाच पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. विविध ठिकाणी सामाजिक संघटना निषेध मोर्चे काढत आहेत.आज येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढून, या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी विलास कोळपे, विनोद वायंगणकर, श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, अभिजीत हेगशेट्ये, प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. प्रकाश नाईक, डी. के. तथा काका कुरतडकर, बी. के. पालकर, प्रसाद पाष्टे, नीलेश आखाडे, सुमित शिवलकर यांचा सहभाग होता. यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)