शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्‍वर तालुक्‍यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ज्या भागात कोरोनाचा फैलाव तसेच उद्रेक झाला आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ज्या भागात कोरोनाचा फैलाव तसेच उद्रेक झाला आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे त्या त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्राचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोराेनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात वाडी-वस्तीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार, १७१७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यातील ४४० ॲक्टिव्ह आहेत. यातील ७३ जणांना उपचाराकरिता रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे, तर होम आयसोलेशनमध्ये ३०९ जणांना ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात रुग्णसंख्या वेगाने वाढली होती. यामध्ये बुधवारी ८३, गुरुवारी ५८ व शुक्रवारी ९९ अशी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या आहे.

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली असल्याने सुमारे ३० पेक्षा अधिक वाड्या-वस्त्या प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुरळ बौध्दवाडी, शिंदेआंबेरी खसासेवाडी, शेंबवणे जावळेवाडी, सायले बौध्दवाडी, निगुडवाडी गुरववाडी, कोंडअसुर्डे कडवई बौध्दवाडी, हरपुडे सुतारवाडी, देवरुख सोळजाई मंदिर, दाभोळे वरचीवाडी, आंबवली मुस्लिमवाडी, आंबवली कारकरवाडी, आंगवली धनगरवाडी, भडकंबा पेठवाडी, जांभुळवाडी बौध्दवाडी. कडवई वाणीवाडी, काटवली पड्यारवाडी, तेर्‍ये, साडवली पातेरेवाडी, साडवली सह्याद्रीनगर, तांबेडी सनगलेवाडी, देवरुख पर्शरामवाडी, कसबा बौध्दवाडी, कोंडगाव रोहिदास आळी, कोंडगाव साखळवाडी, कोंडीवरे मोहल्ला, लोवले, रामपेठ संभाजीनगर, साखरपा हायस्कूल, साखरपा जाधववाडी, विप्रवली मालवाडी आदींचा समावेश आहे.

................................

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गावा-गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने तालुका आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ होत आहे. तालुक्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्याबरोबरच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्या गावातील वाड्यांमध्ये जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याचे कामही आरोग्य यंत्रणेकडून युध्दपातळीवर होत आहे.

.................................

देवरुख-मार्लेश्वर फाटा येथे प्रवेश बंदचा फलक लावण्यात आला आहे.