शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

समिती त्रयस्थ राहिली तरच मोहीमेला भविष्य

By admin | Updated: August 23, 2015 23:33 IST

तंटामुक्त मोहीम : मंडलनिहाय तंटे सोडवणे आवश्यक

सुभाष कदम ल्ल चिपळूण महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीतील राजकीय हस्तक्षेप कमी झाला. गावगुंडी कारभारावर टाच आली. पोलीसपाटील, पोलीस कर्मचारी, तलाठी व इतर अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले व त्रयस्थपणे निर्णय घेतले तरच भविष्यात ही मोहीम टिकणार आहे. अन्यथा शासनाला ही मोहीम गुंडाळावी लागेल. महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम यशस्वी होण्यासाठी समितीची रचना व निर्मिती करतानाच काटेकोरपणे पावले उचलायला हवीत. ग्रामसभेत ज्याला अध्यक्ष केले जाते, त्याचा पूर्वेतिहास व पार्श्वभूमी तपासायला हवी. अनेकवेळा गावात धाकदपटशहा करणारा किंवा मनमानी करणारा तर काही वेळा गावाने ओवाळून टाकलेला सदस्यही अध्यक्ष होतो. या मंडळीला पार्श्वभूमीच नसल्याने अध्यक्षपदाच्या नावाखाली त्यांचे इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष असते. त्यामुळे ते न्याय काय देणार? हाही प्रश्न आहे. अनेकवेळा गावातील चौकट आपला मर्जीतील अध्यक्ष लादते. त्याने काहीही केले नाही तरी वर्षानुवर्षे त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा संधी दिली जाते. गावातील हुशार किंवा प्रतिष्ठित असणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीला समितीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे समितीच्या रचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. काही गावात तर मतदानाचा हक्क नसणारी व्यक्तीही अध्यक्ष झालेली आहे. ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. शासन निर्णयाप्रमाणे समितीची रचना काटेकोरपणे करायला हवी. अनेक गावात ग्रामसभेला येण्याबाबत ग्रामस्थांची उदासीनता असते. त्यामुळे जे १० ते १२ ग्रामस्थ उपस्थित असतात तेच आपल्या मर्जीनुसार समितीची रचना करतात. त्यामुळे योग्य लोकांना संधी मिळत नाही. त्यासाठी सर्वांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपले अधिकार समजून घ्यायला हवेत. अनेकवेळा तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपले नक्की अधिकार काय, याचेही आकलन नसते. तसे त्यांना कोणी मार्गदर्शन किंवा प्रशिक्षितही करत नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या कामाबद्दल माहिती नसते. समितीच्या सभाही फार कमी होतात. एखाद्याने तक्रार अर्ज दिला तर गावकीच्या बैठकीप्रमाणे त्याचा कीस काढला जातो. त्यातून योग्य निर्णय होतच नाही. त्यामुळे तक्रारदारही नाराज होतो. तंटामुक्त समितीच्या बैठकीला पोलीस कर्मचारी, तलाठी, महसूलचे अधिकारी अनेकवेळा अनुपस्थित राहतात. त्यामुळे समितीच्या सदस्यांना योग्य तांत्रिक माहिती मिळत नाही. अनेकवेळा महसूली प्रश्नांबाबत गुंते वाढत जातात. महसूली तंट्यांमुळे जिल्ह्यातील अनेक गावे अद्याप तंटामुक्त झालेली नाहीत. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन मंडलनिहाय तंटे सोडविले तर या तंट्यांवर नियंत्रण येईल व गावे तंटामुक्त होतील.