Ratnagiri: खेडशीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; मुंबई, सुरत येथील चार मुलींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:03 IST2025-05-16T16:02:44+5:302025-05-16T16:03:31+5:30

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलिस यांनी संयुक्त ...

One arrested for prostitution in Khedshi Four girls from Mumbai Surat rescued | Ratnagiri: खेडशीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; मुंबई, सुरत येथील चार मुलींची सुटका

Ratnagiri: खेडशीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एकाला अटक; मुंबई, सुरत येथील चार मुलींची सुटका

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाेलिसांनी मुंबई, सुरत येथील ४ मुलींची सुटका केली असून, एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्यांतर्गत ताब्यात घेऊन घटना स्थळावरून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीत अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकामार्फत एक डमी गिऱ्हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्रासमोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला.

त्या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी ४ मुलींना आणल्याचे निष्पन्न झाले. पाेलिसांनी अरमान करीम खान याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत. या गुन्ह्यात अरमान खानच्या अन्य साथीदारांचा तसेच या ठिकाणी येणाऱ्या गिऱ्हाईकांचाही पोलिस शोध घेत आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस फौजदार सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, महिला हवालदार वैष्णवी यादव यांनी केली.

‘त्या’ चार मुलींची महिला आश्रमात रवानगी

गौरव लॉज येथे वेश्या व्यवसायातून चार मुलींची सुटका करण्यात आली. त्या ४ मुलींची न्यायालयाने एका महिला आश्रमात रवानगी केली आहे.

Web Title: One arrested for prostitution in Khedshi Four girls from Mumbai Surat rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.