शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : अधिकारीच सरकार चालवत आहेत, माणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:06 IST

राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिक ठाकरे यांनी केला.

ठळक मुद्देअधिकारीच सरकार चालवत आहेतमाणिकराव ठाकरे यांचा चिपळुणात आरोपउद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतात

चिपळूण : राज्य व केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहेत. शेतकरी, कामगार, मजूर, उद्योग, सिंचन अशा सर्वच बाबतीत सरकारविरोधात नाराजी आहे. जनता २०१९ची वाट पाहात असून, याचवेळी या सरकारला उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नसून, काही अधिकारीच सरकार चालवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती, आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे चिपळुणात आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीतच, उलट जनतेला आर्थिक खाईत लोटले. त्यामुळे जनता सरकारला धडा शिकवण्याच्या इराद्याने संधीची वाट पाहात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी गोंधळलेले आहेत.

एकाही आश्वासनाची पूर्तता होत नाही. जूनमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, आजही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यादीमध्ये मोठा घोळ आहे. आज शेतकऱ्यांना हमीभावाची मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. चुकीच्या धोरणामुळे जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.

शासनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले आहेत. जीएसटी, नोटाबंदी, महागाई अशा सर्वच विषयात सरकार फेल झाले आहे. त्यामुळे या सरकारकडे सांगण्यासारखा एकही चांगला विषय नाही. हजारो शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने घातला आहे. पाटबंधारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. चुकीचे धोरण यास कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून हे सरकार सत्तेवर आले. मात्र, तीन वर्षात एकही भ्रष्टाचार सरकारने जनतेसमोर आणला नाही, असेही म्हणाले.उद्धव ठाकरे सोयीने शब्द बदलतातराज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गृहखात्याचे अपयश असून, कोरगाव - भीमाच्या घटनेमध्ये बाहेरच्यांचा हात आहे. त्या दृष्टीने चौकशी व्हायला हवी, असे सांगून सरकारमधील सेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने सोयीने शब्द बदलतात, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manikrao Thackreyमाणिकराव ठाकरेRatnagiriरत्नागिरी