शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी रमले भात लागवडीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चिखलात उतरून भाताची रोपे लागवड करण्याबरोबर, नांगरणी करताना बैल हाकण्याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या अधिकारी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : चिखलात उतरून भाताची रोपे लागवड करण्याबरोबर, नांगरणी करताना बैल हाकण्याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी घेतला. निवळी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी केवळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा आनंद अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी घेतला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषी दिनाचे औचित्य साधून निवळी येथे कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, कृषी समिती सभापती रेश्मा झगडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, समाजकल्याण समिती सभापती परशुराम कदम, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच वेदिका रावणंग, उपसरपंच विलास गावडे, तसेच नारळ संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. वैभव शिंदे, भात संशोधन केंद्र शिरगाव संशोधन अधिकारी विजय दळवी, जिल्हा अधीक्षक उर्मिला चिखले, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना मसाल्याच्या झाडांची लागवड, भात पिकाच्या लागवडीतील चारसूत्री पद्धत, भात पीक लागवड प्रात्यक्षिकाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी गतवर्षी भात पीक स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा, तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. वैभव शिंदे यांनी भाजीपाला लागवड व मसाला पिके लागवड याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संशोधन अधिकारी विजय दळवी यांनी भात लागवड करताना घ्यावयाची काळजी, तसेच नागली पिकाचे महत्त्व व फायदे विषद करून लागवडीत येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग ग्रामपंचायत निवळी यांच्या संयुक्त विद्यमाने व पाली मंडल कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.