शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 5:46 PM

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते.

ठळक मुद्दे- कापसाळ ग्रामपंचायत- आरक्षण न मिळाल्यास बहिष्कार टाकणार

चिपळूण :  सध्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणावरून सर्वत्र ओरड होत असतानाच कापसाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने हरकत दाखल केली आहे. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ६२ वर्षांत अनुसूचित जाती-जमातीला येथे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते. या बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क, अधिकार मिळवून दिले. मात्र, आज २१ व्या शतकातदेखील बहुजन समाजातील प्रामुख्याने अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे.सन १९५८मध्ये कापसाळ ग्रामपंचायतीच्या स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत सरपंच, उपसरपंच या प्रमुख पदांसह ग्रामपंचायत सदस्य पददेखील अनुसूचित जाती-जमातीतील बौद्ध समाजाला मिळालेले नाही. कापसाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या समाजाची लोकसंख्या जवळपास २०० ते २५०च्या दरम्यान असूनही अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडत नसेल तर ते दुर्दैव आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण न मिळाल्यास बौद्ध समाज या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी बौद्धजन हितसंरक्षण समितीचे रमण मोहिते, सुभाष मोहिते, सचिव रुपेश हळदे, राहुल कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती मोहिते व अन्य सदस्या उपस्थित होत्या.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत