दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:58 IST2025-03-05T18:58:04+5:302025-03-05T18:58:30+5:30
उद्धवसेनेचा एकच नगरसेवक

दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का
दापोली : दापोली नगर पंचायतीमधील उद्धवसेनेतील नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच नगराध्यक्षा ममता माेरे यांच्याविराेधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेच्या गटनेत्यांसह नगरसेवक आणि शहरप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे.
गटनेत्या शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, नगरसेवक आजीम चिपळूणकर, शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या प्रयत्नातून उद्धव सेनेच्या १२ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सत्ता बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष ममता माेरे यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
उद्धवसेनेचा एकच नगरसेवक राहिल्याने ममता माेरे यांचे पद धाेक्यात आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग तर, उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.