शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

नितीन देसाईंचे 'कोकणचे वैभव' आजही चिपळूणकरांच्या आठवणीत

By संदीप बांद्रे | Updated: August 3, 2023 15:37 IST

८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महिनाभर घेतले होते परिश्रम

संदीप बांद्रे 

चिपळूण : दापोलीचे सुपुत्र, जागतिक किर्तीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कलाकृतीमुळे राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले जानेवारी २०१३ चे ८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आजही चिपळूणकरांच्या स्मरणात असून देसाई यांच्या निधनानंतर त्याविषयीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. या संमेलनासाठी महिनाभर अतिशय परिश्रमातून त्यांनी कोकणचे वैभव उभे केले होते. त्यासाठी सलग १५ दिवस चिपळूणात तळ ठोकून असलेल्या देसाई यांचा सहवास आजही अनेकांच्या आठवणीत राहिला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच येथील अनेकांच्या भावना अनावर झाल्या.  

येथील लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराच्या पुढाकाराने शहरातील पवनतलाव मैदानात 86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.  या संमेलनात देखावे व प्राचीन कोकणचे वैभव दिग्ददर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. संमेलनाच्या आधी महिनाभर हे काम सुरू होते. संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. कोकणचे प्रतिबिंब उमटवणारी स्वागत कमान, मोठ मोठे हत्ती, भव्य रंगमंच, मंदिर, कोकणी परंपरा व कार्यक्रम प्रतिकृतीद्वारे दर्शवले होते. यातून त्यांनी आपल्या कला कौशल्याने संबंध कोकण उभे केले होते. कोकणातील जीवन पध्दती त्यांनी आपल्या कलेने जिवंत केली होती. नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनाचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते. स्वागताध्यक्ष सुनिल तटकरे, माजी आमदार कै. नाना जोशी यांनीही त्यांच्या कलाकृतीला दाद दिली होती. 

नितीन देसाई यांनी अत्यंत आपुलकीने साहित्य संमेलनात संमेलन नगरी सजविण्याचे काम केले होते. कोकणचे ते सुपुत्र असल्याने त्यांना कोकणविषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. अत्यंत प्रेमाने त्यांनी संमेलन नगरी उभी करण्याचे भव्यदिव्य काम केले व देशभर त्याचे कौतुक झाले. चिपळूणसारखे स्वच्छ व्यवहार मला कुठेही दिसले नाहीत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती, असे लोकमान्य टिळक वाचनालाचे तत्कालीन कार्याध्यक्ष प्रकाश देशापांडे यांनी सांगितले. स्वातंत्र दिनी दिल्लीत चित्ररथाच्या माध्यमातून नितीन देसाई यांनी महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवली, असे सांगत कोकणातील एक हिरा गमावल्याची भावनाही देशापांडे यांनी व्यक्त केली. नितीन देसाई यांचे निधन अनेकांना चटका लावून गेले आणि चिपळूणमधील साहित्य संमेलनातील आठवणी जाग्या झाल्या.

देसाई यांचे नाव कलाक्षेत्रात गाजलेले असताना एक दिवस ते येथे आले आणि चिपळूणकरच झाले. मी मोठा कला दिग्दर्शक आहे, असला कसलाही आविर्भाव त्यांच्या वागण्यात नसायचा. दिवस-रात्र कामात व्यस्त असायचे. एक प्रवेशद्वार तयार झाले आणि अचानक दूरदर्शनची गाडी त्या दारातून येणार नाही, असा निरोप आला. आम्ही अस्वस्थ झालो. देसाई शांतपणे पुढे आले आणि म्हणाले, काळजी नको, गाडी मध्यरात्रीनंतर येणार आहे ना... येऊ द्या, करतो व्यवस्था. लगेच कामगार बोलावले स्वतः उभे राहून कमान उतरवली आणि गाडी सहज आत येईल, एवढी उंच केली.

या संमेलनाला खासदार शरद पवार आले असताना सुनिल तटकरे यांनी देसाई यांची खास ओळख करून दिली.  एवढेच नव्हे तर त्यांची कलाकृती पाहून भरभरून दादही दिली होती. कला क्षेत्रात काम करतांना वेगवेगळ्या स्वभावाची असंख्य  माणसं भेटतात. गेले महिनाभर मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा अनुभव बरोबर घेऊन जातोय. मी तुमचा आहे कधीही हाक मारा, निश्‍चित येईन. असा शब्द त्यांनी चिपळूणकरांना जाहीरपणे दिला होता. मात्र आता देसाई हाकेच्या पलिकडे गेले, चिपळूणकरांच्या मनात कायम आठवण ठेवून, अशी भावना प्रकाश देशापांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Chandrakant Desaiनितीन चंद्रकांत देसाईChiplunचिपळुण