शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाचे दर शासनाकडून नव्याने घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

रत्नागिरी : शासनाने गौण खनिजाचे दर नव्याने घोषित केले आहेत. १ जुलै २०२१पासून नवीन गौण खनिजाचे स्वामित्वधनाचे दर समाविष्ट ...

रत्नागिरी : शासनाने गौण खनिजाचे दर नव्याने घोषित केले आहेत. १ जुलै २०२१पासून नवीन गौण खनिजाचे स्वामित्वधनाचे दर समाविष्ट करण्यात आले आहेत, असे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कळविले आहे.

शासनाच्या महसूल, वन विभाग यांच्याकडील ४ जून २०२१च्या राजपत्राद्वारे महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनयमन) नियम २०१३ च्या अखेरीस असलेल्या अनुसूची १ व २ ऐवजी १ जुलै २०२१पासून नवीन गौण खनिजाचे स्वामित्वधनाचे दर समाविष्ट करण्यात आले आहेत. नवीन दर प्रति ब्रास असे : बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेला चुना ६०० रुपये, उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड (सर्व आकारासाठी) आणि दगडाची भुकटी ६०० रुपये, बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड (लॅटराईट स्टोन) १५० रुपये, उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कंकर ६०० रुपये, केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे ३००० रुपये, सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करणे, धातूशास्त्रीय प्रयोजन, दृष्टीविषयक , कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्यासाठी, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी, मातीची भांडी व काच सामान तयार करण्यासाठी-मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता वापरली जाणारी सर्वसामान्य वाळू १,२०० रुपये तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता ६०० रुपये प्रति ब्रास, कौले (मंगलोरी किंवा अन्य) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग व इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भुपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती ६०० रूपये प्रति ब्रास तसेच बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते, त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम दगड ६०० रुपये, विटा तयार करण्याच्या व इतर वापरासाठीची साधी माती, गाळ व सर्वप्रकारची चिकणमाती आदी २४० रुपये, फुलरची माती किंवा बेटोनाईट १५०० रुपये प्रति ब्रास, सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्वप्रकारचे दगड (ग्रॅनाईट वगळून) ३००० रुपये, इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने १० फेब्रुवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) ६०० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.

अनुसूची दोन (ठोकबंद भाडे) - गौण खनिज (ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने १० फेब्रवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) ९००० प्रति हेक्टर किंवा त्यांच्या भागासाठी ठरविण्यात आले आहे.