मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला, चिपळुणात खळबळ

By संदीप बांद्रे | Published: October 16, 2023 03:13 PM2023-10-16T15:13:51+5:302023-10-16T15:14:33+5:30

मुंबई-गोवा महामार्ग बंद, मुंबईच्या टीमला पाचारण, राष्ट्रीय महामार्ग विभागाची धावाधाव

New flyover on Mumbai Goa highway collapses with launcher mechanism, excitement in Chiplun | मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला, चिपळुणात खळबळ

मुंबई-गोवा महामार्गावरचा नवीन उड्डाणपुल लॉंचरच्या यंत्रणेसह कोसळला, चिपळुणात खळबळ

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील बहादूरशेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता मधोमध खचल्याचा प्रकार घडला होता. मात्र दुपारी २.४५ वाजता हा पूल लॉंचरच्या यंत्रणेसह अचानक कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. या घटनेने चिपळुणात खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिक करत गर्डरमधील स्टीलसह काँक्रीट देखील तुटले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचीही धावाधाव झाली मुंबईतील अभियंता टीमला पाचारण केले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख नका ते प्रांत कार्यालय पर्यंत उड्डाणपूल होत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सर्वात मोठा उड्डाणपूल असून सुमारे १.८१ की.मी.इतकी या पुलाची लांबी आहे. तर ४६ पिलर त्यासाठी उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण झाल्या नंतर शहरातील बहादूरशेख येथून पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू होते. मात्र नव्याने चढविलेले गर्डर सोमवारी सकाळी ८ वाजता काम सुरू असतानाच खचले. यावेळी मोठा आवाज झाला झाला. 

या घटनेमुळे आधीच चिपळूणकर धास्तावले असताना सोमवारी दुपारी २.४५ वाजता गर्डर उभारण्यासाठी वरती ठेवलेल्या लॉंचरसह नवीन पूल कोसळला. या घटनेवेळी मोठा आवाज झाला आणि  जणू परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. बहाद्दूर शेख नाक्यावर एकच धावपळ उडाली. वाहन चालकांसह नागरिकांनी देखील अक्षरशः धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बहाद्दूर शेख नाक्यावर प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली असून नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असून दोन्ही बाजूनी वाहनांची रांग लागली आहे. त्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करून हळूहळू वाहने सोडली जात आहेत.

Web Title: New flyover on Mumbai Goa highway collapses with launcher mechanism, excitement in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.