शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:03 PM

राजापूर तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देशेजवलीत बिबट्याचे दोन बछडे जेरबंदबछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार

राजापूर : तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.गेले काही दिवस बिबट्याचे दोन बछडे शेजवली गावात दिसत होती. सुमारे सहा महिन्याचे हे बछडे कुणाच्या ना कुणाच्या घरात जात होती. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही बछडे शालेय विद्यार्थ्यांना दिसली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे एक बछडे पळाले होते तर दुसरे कणगीच्या बेटावर चढून बसले होते. त्यावेळी वन विभागाने त्याची सुटका केली होती.दरम्यान, गुरुवारी शेजवलीतील विजय गुणाजी परवडे यांच्या घरात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली. त्यावेळी घरातील सर्वांनी आरडाओरड केल्यानंतर दोन्ही बछड्यांनी शेजारी असलेल्या प्रकाश महादेव मांजरे यांच्या घरानजीक असलेल्या लाकडाच्या माचाखाली आसरा घेतला होता.ही माहिती शेजवलीचे उपसरपंच मंदार राणे यांनी राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल घाडगे वनरक्षक संजय रणधीर यासहीत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

प्रथम माचाखाली जाऊन बसलेल्या दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. आता त्या दोन्ही बछड्यांना जुन्नर येथील पालन केंद्रात रवाना केले जाणार आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग