मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीची अनुपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:25 IST2020-02-17T10:25:33+5:302020-02-17T10:25:38+5:30

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करू. मात्र, केवळ देखावा करण्यासाठी गणपतीपुळे येथे मुळीच जाणार नाही.

NCP leader will not visit Chief Minister Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीची अनुपस्थिती

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीची अनुपस्थिती

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते मंडळींची यांची यावेळी उपस्थिती असणार असल्याचा अंदाज बांधला जात असताना, उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या दौऱ्यावेळी रलागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत.

राज्यात जशी महाविकास आघाडी झाली तशी रत्नागिरीत झालेली नाही. येथे शिवसेनेकडून केवळ आघाडीचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे अशी महाविकास आघाडी काय कामाची? त्यामुळेच या दौऱ्यावेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करू. मात्र, केवळ देखावा करण्यासाठी गणपतीपुळे येथे मुळीच जाणार नाही. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी एकही विकासकाम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात केलेले नाही. शहरातील सर्व कामे ही शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात होत आहेत. समतोल विकासाला साळवी यांनी तिलांजली दिली आहे. त्यामुळेच ही खोटी आघाडी मान्य नाही, असे मयेकर यांनी सांगितले.

Web Title: NCP leader will not visit Chief Minister Uddhav Thackeray