शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-सेनेतच कडवी झुंज

By admin | Updated: October 6, 2015 23:45 IST

चार पक्ष निवडणुकीत उतरणार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांची पोटनिवडणूक जशी जवळ येत आहे तसे वातावरण तापत चालले आहे. येत्या १ नोव्हेंबरला होणाऱ्या या पोटनिवडणूकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मनसे हे चार पक्ष आखाड्यात उतरले आहेत. मात्र राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातच कडवी लढत होणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.रत्नागिरी पालिकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत सेना-भाजपची युती होती. सेनेला सर्वाधिक १३ तर भाजपला ८ जागांवर विजय मिळाला होता. २१ जागांवर निर्विवाद विजय मिळाल्याने युती पालिकेत सत्तेवर आली. राष्ट्रवादीला ६ तर कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र, युतीचा हा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर राज्यातील सेना-भाजप युती तुुटली अन पालिकेतील युतीची सत्तेची घडीही विस्कटली. पाच वर्षांच्या सत्तेत अडीच वर्ष नगराध्यक्षपद दोन्ही पक्षांकडे राहणार असल्याचे ठरले होते. मात्र, त्यातील सव्वा वर्षाचा काळच सेनेला नगराध्यक्षपद मिळाले. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून पालिकेतील सेना-भाजपमध्ये नगराध्यक्षपदावरून शीतयुध्द सुरू आहे. पोटनिवडणूकीच्या निमित्ताने आखाडा मोकळा झाला आहे. भाजपा व सेना याच मुद्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यात मनसेही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मात्र शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्येंनी सेनेपुढे पोटनिवडणूकीत मोठे आव्हान निर्माण ्रेकेले आहे. त्यामुळे शिवसेनाही कडवेपणाने उमेश शेट्ये यांना या निवडणूकीत पराभूत करण्यासाठी व त्यांचे राजकीय मनसुबे उधळण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)२०१६ ची लिटमस टेस्ट?रत्नागिरी हा मतदारसंघ वर्षभरापूर्वी प्रथमच शिवसेनेला मिळाला. राष्ट्रवादीतून सेनेत जाऊन या जागेवर उदय सामंत विजयी झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक त्यांच्याच मतदारसंघात होत असून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान सामंत यांच्यापुढेही आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणूकीसाठी ही पोटनिवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे सामंत, शेट्ये यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.रत्नागिरी पालिका पोटनिवडणूक कार्यक्रमएकूण जागा-४ प्रभाग २ व ४- प्रत्येकी दोन जागानामनिर्देशन स्वीकारणे-१ ते ८ आॅक्टो.छाननी- ९ आॅक्टोबर २०१५माघार-१९ आॅक्टोबर २०१५मतदान केंद्र यादी-२६ आॅक्टोबर.मतदान- १ नोव्हेंबर २०१५. मतमोजणी व निकाल-२ नोव्हेंबर. राजपत्रात निकाल प्रसिध्दी-६ नोव्हेंबर