शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएल'मुळे युवा गुणवान खेळाडूंना संधी; लिलावासाठी नोंदणीकृत खेळाडू किती, कधी होणार स्पर्धा, रोहित पवारांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:20 IST

दापोली : महाराष्ट्र प्रीमिअर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या ओनाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या ...

दापोली : महाराष्ट्र प्रीमिअर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या ओनाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेटपटू मिळणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आमदार रोहित पवार यांनी दिली. मे ते जूनदरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र प्रीमिअर लीगची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फिल्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे अध्यक्ष सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, बिपिन बंदरकर उपस्थित होते.रोहित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रीमिअर लीग हा केवळ एक स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, तांत्रिक टीम आणि कर्मचारी यांचे परिश्रम या यशामागे आहेत. राज्याच्या कोनाकोपऱ्यात व तळागाळात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा, होतकरू व गुणी खेळाडूंना आपले टॅलेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमिअर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ साठी खेळाडूंचा लिलाव पुणे येथे एप्रिल महिन्यात पार पडला. या वर्षीच्या लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

गुणवत्ता दाखविण्याची संधीपश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स व पुष्प सोलापूर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ईगल नाशिक टायटन्स, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ४ एस पुणेरी बाप्पा या संघाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRohit Pawarरोहित पवार