माकडाचा पाठलाग नडला, बिबट्या मृत्यूमुखी पडला, देवरुख जवळची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:23 IST2020-04-13T16:16:02+5:302020-04-13T16:23:18+5:30
देवरुख नजिकच्या आंबव येथे माकडाचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विजेच्या तारेला चिकटून दुर्दैवी मृत्यू झाला.

माकडाचा पाठलाग नडला, बिबट्या मृत्यूमुखी पडला, देवरुख जवळची घटना
ठळक मुद्देमाकडाचा पाठलाग नडला, बिबट्या मृत्यूमुखी पडलादेवरुख जवळची घटना
देवरुख : नजिकच्या आंबव येथे माकडाचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विजेच्या तारेला चिकटून दुर्दैवी मृत्यू झाला.
माकडाला भक्ष बनवण्याच्या नादात बिबट्या धावला खरा मात्र माकडाने विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर उडी मारली.
यात माकडही मृत झाले. आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला विजेच्या तारेचा धक्का बसल्याने तोही मृत झाला.