सरकारकडून कोकणी लोकांची थट्टा; प्रवीण दरेकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:23 IST2020-06-08T14:23:25+5:302020-06-08T14:23:43+5:30
प्रवीण दरेकर सोमवारी दापोलीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी करण्यासाठी आले आहेत.

सरकारकडून कोकणी लोकांची थट्टा; प्रवीण दरेकर यांचा आरोप
- शिवाजी गोरे
दापोली : झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने दोन जिल्ह्यांसाठी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची मदत म्हणजे कोकणी लोकांची थट्टा आहे. राज्य सरकाने कोकणी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.सरकारच्या या मदतीवर आम्ही विरोधी पक्ष म्हणून समाधानी नसल्याचे ते म्हणाले.
प्रवीण दरेकर सोमवारी दापोलीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी करण्यासाठी आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. परंतु सरकार गंभीर नाही. खरे तर यापेक्षा तिप्पट मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.