कृषी शिक्षण धोरण समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:39+5:302021-07-18T04:22:39+5:30

चिपळूण : कृषी शिक्षण धोरण समितीची बैठक ॲग्रीकल्चर कॉलेज, पुणे येथे शुक्रवारी झाली. समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पुरी ...

Meeting of Agricultural Education Policy Committee | कृषी शिक्षण धोरण समितीची बैठक

कृषी शिक्षण धोरण समितीची बैठक

चिपळूण : कृषी शिक्षण धोरण समितीची बैठक ॲग्रीकल्चर कॉलेज, पुणे येथे शुक्रवारी झाली. समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची कृषी शिक्षणासंदर्भात नवीन धोरण निश्चितीसाठी उच्चस्तरीय समितीची तिसरी बैठक झाली.

यावेळी डॉ. पुरी यांच्यासह आमदार शेखर निकम, डॉ. एस. एस. मगर, आमदार राहुल पाटील, आमदार प्रतिभा धानोरकर, डॉ. एस. एल. साळे, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. फरांदे, डॉ. सतीश नारखेडे, आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी कृषी विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया धोरणाच्या सर्व मसुद्याला अंतिम स्वरूप देणे, शासकीय पदवी महाविद्यालयांमध्ये स्वयं वित्त जागा, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या मॉडेल ॲक्ट व शुल्क नियंत्रण कायद्याच्या आधारे संलग्न महाविद्यालयांचे सनियंत्रण नियमावलीबाबत सादरीकरण, पाचव्या अधिष्ठाता समितीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संलग्नित महाविद्यालयांच्या मूल्यांकन तक्त्याबाबत चर्चा, पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रिया भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे घेणेबाबत चर्चा, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये ऐच्छिक बदली धोरण चर्चा आदी महत्त्वाच्या विषयांना मूर्त स्वरूप देण्यात आले.

Web Title: Meeting of Agricultural Education Policy Committee