शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी लवकरच उपाययोजना राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.

चिपळुणातील वाशिष्ठी व शिवनदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे तसेच वाशिष्ठी नदीमध्ये बहाद्दूरेशख नाका, फरशी पूल, नाईक कंपनी व पेठमाप पेठमाप पुलानजीक गाळाचे बेट निर्माण झाले आहे. हे बेट हटविणे आवश्यक आहे तसेच पूरसंरक्षक कामांमध्ये नदीच्या बाजूस काठावर भराव करणे, तसेच दगडी अथवा संधानक अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण शहरात काही ठिकाणी नागमोडी वळणाने वाहते. त्यामुळे अशा ठिकाणी नदीच्या प्रवाहाला खोलीकरण व रूंदीकरण करून उचित दिशा देणे आवश्यक आहे.

नदीच्या आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. गोवळकोट खाडी भागातील गाळ काढणे आवश्यक आहे. नदीतील गाळाच्या भरावासाठी वापर करावा, जंगलतोड बंदी करावी, खासगी जमिनी जंगल वाढीसाठी वनविभागाकडे वर्ग करण्याची तरतूद व्हावी. चिपळूण शहरातील नदीकिनारी वृक्ष संवर्धनासाठी ग्रीन बेल्ट असतो तसा संपूर्ण नदीकिनारी भाग आरक्षित करण्यात यावा. संपूर्ण वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करून सीमांकन करणे आवश्यक आहे. डोंगर खोदण्यास व उत्खननास पूर्णपणे बंदी करणे आवश्यक आहे. चिपळूण शहरात स्टील्ट पार्किंग करुन बांधकामे करावीत. अशा विविध उपाययोजना होणेबाबत आमदार शेखर निकम यांनी चर्चा केली. या सर्व मुद्द्यांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.