शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा खाते संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:29 IST

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाई

रत्नागिरी : मराठी भाषा हे खाते अतिशय संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक आहे. या खात्याकडे सगळ्यांनी अतिशय डाेळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे हे खाते आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे उपयुक्त खात आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथे पत्रकार परिषदेत दिली.त्यांनी सांगितले की, या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ, चार महामंडळ चालविली जातात. अखिल भारतीय साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन या खात्यामार्फत हाेतात. या खात्याशी साहित्यिकांचा, कलाकारांचा संबंध येताे. या खात्यामार्फत मराठी वाङमय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेच्यानिमित्ताने तालुकास्तरापर्यंत चांगले उपक्रम राबविण्यासाठी आम्ही यशस्वी ठरू, असे ते म्हणाले.

केंद्रशासनाकडून अभिजात भाषेची जी यंत्रणा आहे, त्यामधून जाे निधी मिळवायचा आहे, ताे कराेडाे रुपयांचा निधीही महाराष्ट्रासाठी मिळवू, असे मंत्री सामंत म्हणाले. जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयाेग झाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू. मराठी भाषा विभागाचा वर्षभराचा आराखडा तयार केला जाणार आहे.जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करायचे आहे, कवितांचे गाव करायचे आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायची आहेत, युवा साहित्यिक, युवा कवी, युवा लेखक तयार करायचे आहेत. मराठी भाषेच खात महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी उपयुक्त आहे. शालेय शिक्षणापर्यंत मराठी, व्यवहारात मराठी, न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा प्रकारचे विविध उपक्रम घेऊन मराठी भाषेचे काम करणार आहाेत.

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाईमहाराष्ट्र सर्व जाती, धर्मांनी, पंथांनी जरी नटलेला असला, तरी मराठी माणसाला त्रास देणे किती महागात पडू शकते, हे शासनाने दाखविले आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचे सरकार आहे, मराठी माणसाला जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका काेणी घेत असेल, तर त्याच्यावर कठाेर कारवाई केली जाईल ही शासनाची भूमिका आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत