Maratha Reservation Video: मी दिले अन् शिवसेनेने रद्द केले, मराठा आरक्षणावरुन राणेंचा सेनेवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:43 IST2018-08-02T15:32:31+5:302018-08-02T15:43:25+5:30
Maratha Reservation: मराठा आणि मुस्लिमांचे आरक्षण शिवसेनेला नको आहे. मी सत्तेत असताना मंजूर केलेले आरक्षण शिवसेनेनेच रद्द केले, असा आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

Maratha Reservation Video: मी दिले अन् शिवसेनेने रद्द केले, मराठा आरक्षणावरुन राणेंचा सेनेवर प्रहार
रत्नागिरी - मराठा आणि मुस्लिमांचे आरक्षण शिवसेनेला नको आहे. मी सत्तेत असताना मंजूर केलेले आरक्षण शिवसेनेनेच रद्द केले, असा आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत येथे एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी शिवसेनेवर तोफ डागली. तसेच कोकण विकासावरही राणे यांनी भाष्य केले.
मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. तर राज्यभरात मराठा समाजाकडून सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. आपण सर्वच पक्षांची ध्येयधोरणे जवळून पाहिली आहेत. सर्वच पक्ष फक्त आश्वासने देतात. म्हणूनच स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना दिलेला शब्द पाळण्याला आपण अधिक महत्त्व दिले आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी कोकण विकासावर बोलतानाच शिवसेनेवरही कडाडून टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेमुळे आरक्षण रद्द झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, राणेंनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील असून लवकर आरक्षण मिळावे, यासाठी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पाहा व्हिडिओ -