शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: स्क्रॅच कुपनवर मोठ्या बक्षिसाचे आमिष, राजापुरात अनेकांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:37 IST

पाच मिनिटात तुमची वस्तू गाडीतून घेऊन येतो म्हणत पसार

राजापूर : स्क्रॅच कुपनवर मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवत एका टोळक्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना हजारो रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरातील अनेकांना या टोळक्याने गंडा घातल्याचे समोर आले आहे. या टोळक्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे. मात्र आपले हसे होईल, या भीतीने अनेकांनी तक्रार देणे टाळले आहे.या कुपनवर शुभांगी एंटरप्राईजेस, राजारामपुरी, ८ वी गल्ली, कोल्हापूर असा उल्लेख आहे. मात्र, दूरध्वनी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर त्यावर नाही. त्यामुळे या पावत्या खोट्या छापून घेण्यात आल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कुपनची किंमत शंभर रुपये आहे. या टोळक्यातील एखादी महिला प्रथम घरात जाते आणि औषधे घेण्यासाठी पाणी मागते. गप्पा मारता मारता आपण एका कंपनीचे काम करत असून, बक्षिसांचे आमिष दाखवत शंभर रुपयांचे कुपन घेण्यास सुचवते. जर कोणी सहज कुपन घेतले तर त्याला अजून कुपन घेण्याच्या मोहात पाडले जाते. प्रत्येक कुपनवर काही ना काही लागतेच, असे सांगून मोठी इलेक्ट्रिक वस्तू ज्या कुपनवर आहे, त्याचा ॲडव्हान्स ही महिला घेते. पाच मिनिटात तुमची वस्तू आमच्या गाडीतून घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही फोटो काढण्यासाठी तयारीत करा, असे सांगून तिथून निघून जाते.या कुपनवर २२ इंची एलईडी टीव्ही, शिलाई मशीन, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, मोबाइल, मिक्सर व इस्त्री, ग्लास टॉप शेगडी अशा जवळपास १६ इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश आहे. यातील जी वस्तू कुपन स्क्रॅश केल्यावर लागेल ती अर्ध्या किमतीत घरपोच मिळण्याचे आमिष दाखवण्यात येते. अनेक लोक या फसवणुकीला बळी पडले आहेत. काही जणांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. पोलिस काय करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस