शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ राजापूरमध्ये बंडखोरी, चार मतदारसंघांत दुरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:09 IST

रत्नागिरी, गुहागरला बंडखोरी मागे

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उदय बने आणि गुहागरमध्ये भाजपचे संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्ह्यात आता केवळ राजापूर मतदारसंघात बंडखोरी आहे. तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतलेला नाही.

जिल्ह्यात पाच मतदारसंघात ३८ उमेदवार आहेत. अनेक अपक्ष रिंगणात असले तरी चार मतदारसंघात प्रमुख लढत दुरंगी तर राजापुरात तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर अशा तीन मतदारसंघात बंडखोरी झाली होती. रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उमेदवार बाळ माने रिंगणात असतानाही उद्धवसेनेच्याच उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सोमवारी माघार घेतली.गुहागरमध्ये भाजपला उमेदवारी न मिळता शिंदेसेनेच्या राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुढळे भाजपच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागरमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी त्यांनी माघार घेतली.राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडूकन उद्धवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा नसल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ते सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी राजापूरवगळता इतर चार मतदारसंघांमधील प्रमुख लढत दुरंगीच होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024