शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:08 IST

काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा कळीचा मुद्दा

राजापूर : सलग २९ वर्षे राजापूर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेतील फुटीमुळे यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. अर्थात, काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या बंडखोरीचा परिणाम इतर कोणत्या पक्षावर होणार, दोन प्रमुख पक्षांच्या लढतीत बंडखोर उमेदवाराला किती वाटा मिळणार, हे पाहणे रंगतदार होणार आहे.मागील तीन निवडणुकांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आमदार राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत असली, तरी यावेळी त्यांना शिवसेनेचाच सामना करावा लागणार आहे. त्याच वेळी सोबत असलेल्या काँग्रेसशीही त्यांना सामना करावा लागणार आहे.उद्धवसेनेच्या विरोधात येथे महायुतीकडून शिंदेसेनेचे किरण सामंत निवडणूक लढवत आहेत. ते प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरले असले, तरी २००४ पसून उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे. उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी २००५ पासून या मतदारसंघात कार्यरत आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, २००९, १४ आणि १९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. हा अनुभव त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणारा आहे.मागील निवडणुकीत आमदार साळवी यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यावेळी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कोणासाठी फायदेशीर ठरणार आणि त्यांच्या उमेदवारीचा कोणाला तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात, त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा तोटा होणार की, ते आणखी काही वेगळे चित्र उभे राहणार, हे मतदारच ठरवतील आणि त्यालाही आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

 

  • लाेकसभा निवडणुकीपासून मतदारसंघातील गावागावात केलेला दौरा किरण सामंत यांचे बलस्थान ठरणार आहे.
  • १५ वर्षांत मतदारसंघाशी असलेला संपर्क हे राजन साळवी यांच्यासाठी बलस्थान आहे.
  • अविनाश लाड यांची उमेदवारी हा या मतदारसंघातील सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरणार आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024