शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

महागावात महाछापा !

By admin | Updated: July 9, 2015 00:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : वाहनांसह वाळू उपशाच्या बोटी जप्त

सातारा : सातारा तालुक्यातील महागाव येथे कृष्णा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. या मोठ्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. महागाव येथील कृष्णा नदीतीरावर बुधवारी रात्री अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल यांना मिळाली. त्यांनी महसूल उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकासह सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात महसूल विभागाची वाहने घटनास्थळी येताच वाळू उपसा करणाऱ्यांची पाचावर धारण बसली. वाळू उपसा करणारे सैरावैरा जिकडे जागा मिळेल तिकडे पळायला लागले. अंधाराचा फायदा घेऊन अनेकजण गायबही झाले. नदीत बोटीच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू होता. दोन मोठे व एक छोटा जेसीबी, दोन पोकलॅन, एक डंपर, एक ट्रक, तीन ट्रॅक्टर, पाच ट्रॉल्या ही वाहने घटनास्थळी उभी होती. अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा सुरू होता. रात्री उशिराने ही कारवाई करण्यात आल्याने येथील वाळू ठेका वैध की अवैध, याची खातरजमा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उपसा केलेल्या वाळूची मोजमापे घेण्याचेही काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गनिमी कावा !जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अत्यंत गोपनीयरीत्या ही कारवाई केली. ‘चला, एका ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे,’ असं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत ही कारवाई केली. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपण नेमक्या कुठल्या कार्यक्रमाला निघालो आहोत, याची तिळमात्र कल्पनादेखील नव्हती. रात्रीच्या अंधारात कारवाईसाठी निघालेल्या गाड्या क्षेत्रमाहुलीतून महागावच्या दिशेने निघाल्या तेव्हा कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या गनिमी काव्याची जाणीव झाली.महागाव येथील अवैध वाळू उपशाप्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील. तसेच संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनाही नोटिसा देण्यात येणार आहेत. - अश्विन मुद््गल, जिल्हाधिकारी