शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा शुल्क न आकारल्याने पाच कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:37 IST

चिपळूण : घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्वीकारण्याबाबतची अधिसूचना नगरपरिषदेला १९ डिसेंबर २०१८ रोजी प्राप्त झाली. राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार ...

चिपळूण : घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्वीकारण्याबाबतची अधिसूचना नगरपरिषदेला १९ डिसेंबर २०१८ रोजी प्राप्त झाली. राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अधिसूचनेनुसार नगर परिषदेने उपविधीमध्ये नमूद असलेल्या दराप्रमाणे शुल्कवसुली करणे बंधनकारक होते. मात्र मागील दोन वर्षांत अधिसूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसूल न केल्याने नगर परिषदेचे सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. तेव्हा नगर परिषदेचा याविषयीचा बेकायदेशीर ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिलेल्या पत्रात मुकादम यांनी म्हटले आहे की, नगर परिषद उत्पन्नवाढीसाठी शासनाने ९ डिसेंबर २०१८ मध्ये परिपत्रक पाठविले. घनकचरा व्यवस्थापन कर आकारण्याबाबत २९ जानेवारीच्या सभेत प्रशासनाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने २८ ऑगस्ट रोजी कर भरण्याचे नागरिकांना आवाहन केले. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने या करामुळे आपले नुकसान होईल, या भीतीने नगराध्यक्षांनी १ सप्टेंबर रोजी तातडीची सभा घेत करवसुलीला स्थगिती देण्याचा ठराव केला आहे. मुळातच या कराची २०१८ पासून अंमलबजावणी न झाल्याने नगर परिषदेचे सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच राजकीय स्वार्थापोटी पुन्हा स्थगिती आल्यास आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करून करवसुलीचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.